अऱ्हेर नवरगांव घाटावरील अवैध रेती उत्खनन बंद करून MSMC व खाजगी रेती साठा वेगवेगळा करण्यासाठी निवेदन…

0
112

ब्रम्हपुरी प्रतिनिधी :- तालुक्यातील अऱ्हेरनवरगांव (मकरधोकडा) नदी पात्रातील मागील दोन दिवसांपासून रेती अवैधरीत्या पोखल्यांड व जेसिपी च्या मदतीने रात्रीच्या सुमारास उत्खनन करून अवैध रेतीची हायवा ट्रक ने मोठ्या प्रमाणात रेती तस्करी बाहेर जिल्ह्यात केली जाते तर सदर घाटावर महाराष्ट्र राज्य खनिजकर्म महामंडळ व खाजगी कंत्राटदार यांची रेती अनेक महिन्यांपासून एकत्रित ढीग असल्याने मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून शासनाचा लाखोंच्या महसूल बुडतो आहे. सदर रेती घाटावरून रात्रीच्या प्रहरी मोठ्या प्रमाणातील अवैध रित्या होणारे उत्खनन तात्काळ बंद करून शासनाची व खाजगी रेती साठा वेगवेगळा करावा अन्यथा
महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा दिलेल्या निवेदनातून केला आहे.
अऱ्हेरनवरगांव (मकरधोकडा ) नदी पात्रातील रेती मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पोकल्यांड,जेसीपी च्या साहाय्याने रात्रीच्या सुमारास अवैध रित्या उत्खनन करून राजरोसपणे तब्बल ५०ते ६०ट्रॅक्टरच्या साहाय्याने व हायवा ट्रकने अवैध रेतीची तस्करी केली जात आहे मात्र प्रशासनाच्या माल सुतावू धोरणामुळे कोणतीच कारवाई होत नाही.तसेच मागील काही महिन्यांपासून अऱ्हेरनवरगांव.(मकरधोकडा) नदी काठावर गट क्र.८१९/१ व ८१९/२ महाराष्ट्र राज्य खनिज कर्म महामंडळ व खाजगी कंत्राटदार मंडल यांचा रेती साठा एकत्रित असल्या कारणाने रेती तस्कर त्या ठिकाणावरून अवैध रित्या रेती चोरीत आहेत त्याचा फटका शासनाला बसत असून लाखोंचा महसूल बुडत आहे.जर MSMC व खाजगी कंत्राटदार याचा एकूण रेती साठा मोजून वेगवेगळा केल्यास प्रशासनास चोरी पकडण्यास सोप होऊ शकते मात्र तसे न करता आजतागायत एकत्रित साठा उपलब्ध दाखऊन रेती चोरांना प्रोत्साहित करण्याची भूमिका शासनाची दिसून येत आहे.अऱ्हेरनवरगांव. (मकरधोकडा )नदी घाटावरील रात्रीच्या अंधारात होणारे अवैध उत्खनन ताबळतोब थांबवावे व एकत्रित केलेला रेती साठा तात्काळ वेगवेगळा करावा अन्यथा महाराष्ट्र नव निर्माण सेना तीव्र आंदोलन करेल असा इशारा मा.तहसीलदार ब्रम्हपुरी यांना दिलेल्या निवेदनातून देण्यात आला. सदर निवेदन महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे ब्रम्हपुरी तालुकाध्यक्ष सूरज शेंडे यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळेस तालुका उपाध्यक्ष मंगेश फटींग, हरिष हटवार, नितीन पोहरे, शहर अध्यक्ष दिपक मेहर,सुरज करंबे , नितीन विकार, पवन गायगवळी इतर मनसे सैनिकांची उपस्थिती होते.
– प्रतिभा मैंद
(7972250918)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here