Home गडचिरोली दारू तस्कर सुनील पंजवानी यास तीन वर्षाचा सश्रम कारावास…

दारू तस्कर सुनील पंजवानी यास तीन वर्षाचा सश्रम कारावास…

508

चक्रधर मेश्राम सहसंपादक

गडचिरोली:गडचिरोली जिल्ह्यात दारुबंदी असतांना अवैध रितीने दारूची तस्करी करणाऱ्या प्रतीष्ठीत परिवारातील ओळख असलेल्या सुनील पंजवानी या आरोपीस न्यायालयाने तीन वर्षाचा सश्रम कारावास व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.आरोपीच्या विरोधात गडचिरोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला असून, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार खेमराज नवघरे यांनी काम केले आहे.

. आरोपी सुनील गोवर्धन दास पंजवानी यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले असून न्यायालयाने साक्षीदार तपासून नमूद आरोपीविरुद्ध भरपूर पुरावे उपलब्ध झाल्याने सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरून आरोपीस तीन वर्ष सश्रम कारावास व 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे .
दंड न भरल्या दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या गुन्ह्याच्या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी अभियोक्ता डी. के. खोब्रागडे यांनी बाजू मांडली असून, पोटपैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम यांनी काम पाहिले आहे.

Don`t copy text!