Home चंद्रपूर आरवट मध्ये आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प संपन्न…

आरवट मध्ये आयुष्यमान भारत योजनेचा कॅम्प संपन्न…

362

चंद्रपूर- दि 5 -आयुष्यमान भारत योजन किंवा प्रधान मंत्री जन आरोग्य योजना किंवा राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना ही एक केंद्र सरकार पुरस्कृत योजना आहे, जी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष्मान भारत मिशन अंतर्गत २०१८ मध्ये सुरू केली गेली. या योजनेत गरीब कुटुंबांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याची तरतूद आहे. ही योजना केवळ गरिबांसाठी असून शहरी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांना याचा लाभ मिळू शकतो. आयुष्मान भारत योजना सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये कॅशलेस आणि पेपरलेस आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध हॉस्पिटलमध्ये दाखल होणे आणि हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यानंतरचा खर्च कव्हर होतो. या योजनेत सुमारे 1400 पॅकेज सहभाग करण्यात आले आहेत. ज्यामध्ये गूडघ्याचे प्रत्यारोपण, कोरोनरी बायपास, स्टेरिंगसारखी उपचार सामील आहेत.याप्रसंगी

ग्रा.पं.आरवटच्या सरपंच सौ सुलभा भोंगळे, ग्रा.रुग्णालय बल्लारपूरचे हेल्पडेस्क कोऑर्डीनेटर अक्षय देशमुख, आयुष्यमान भारतचे *कार्पोरेट ऑपरेटर नितेश गायकवाड, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर व गावातील नागरिक उपस्थित होते.

Don`t copy text!