नागभीड तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्ष पदी श्री.कमलाकरजी ठवरे यांची बहुमताने निवड…

0
114

आज दि.५.८.२०२१ ला नागभीड येथे चंद्रपूर जिल्ह्याचे सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष हेमंत लांजेवार यांनी जिल्हा अध्यक्ष म्हणून मिटिंग बोलवली आणी त्या सभेमध्ये नागभीड तालुक्यातील ५६ सरपंच्यापैकी ३६ सरपंच्यानी जिल्हा अध्यक्ष हेमंत लांजेवार यांच्या कडे पत्र सोपविले की श्री.कमलाकरजी गोविंदाजी ठवरे यांना अध्यक्ष करावे आणि ३६ लोकांचे बहुमत असल्यामुळे त्यांची निवड घोषित करण्यात आली भाजपचे १६ सदस्य सभागृहात होते परंतु बहुमत न दिसल्यामुळे सभागृहातून परत गेले व बहुमत कामलाकरजी ठवरे यांच्या बाजूने असल्यामुळे सरपंच सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष हेमंत लांजेवार यांनी त्यांची नागभीड तालुका सरपंच सेवा संघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली अशी घोषणा केली त्या नंतर जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष गट नेता डॉ.सतीशभाऊ वारजूकर यांनी कमलाकरजी ठवरे यांना शुभेच्छा दिल्या या वेळी,तालुका कांग्रेस कमिटी अध्यक्ष प्रमोद चौधरी,कांग्रेस चे जेष्ठ नेते भाऊरावजी पांडव काकाजी,पुरुषोत्तममजी बगमारे,नगरसेवक प्रतिकभाऊ भसीन,रमेश ठाकरे,अमोल बावनकर,सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष हेमंत लांजेवार,सरपंच अमोल बावनकर,सरपंच प्रशांत गायकवाड,सौरभ मुळे,व सरपंच संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here