Homeचंद्रपूरजिवतीमाणिकगडची जमिन अल्ट्राटेक कंपनीच्या नावाने नियमबाह्य फेरफार...तत्कालीन तहसिलदार जिवती प्रशांत बेडसे यांचा...

माणिकगडची जमिन अल्ट्राटेक कंपनीच्या नावाने नियमबाह्य फेरफार…तत्कालीन तहसिलदार जिवती प्रशांत बेडसे यांचा प्रताप..अदिवासी जमिनीचा महाघोटाळा..

दिपक साबने,जिवती

जिवती तालुक्यातील कुसुंबी येथिल शेतकऱ्यांची जमिन माणिकगड कंपनीने बळकावून कंपनी थाटल्याचे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाही जिवतीचे तत्कालीन तहसिलदार प्रशांत बेडसे यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून माणिकगड कंपनीच्या नावाने असलेली जमिन अल्ट्राटेकच्या नावाने करून शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला असून याबाबत गोंडवाना गणतंञ पार्टी,राष्ट्रवादी पार्टी व जनसत्याग्रह पार्टीच्या वतीने पञकार परिषद घेऊन संबंधित तहसिलदारावर कार्यवाहीची मागणी केली आहे.
अतिदुर्गम आदिवासी भागातील मौजा कुसूंबी येथिल २८ आदिवासी कुटुबांची ६३.६३ हे.आर. जमिन शासनाने दि.१७/८/१९८१ ला चुनखडी खनिज लिज करार केला व ही जमिन माणिकगड सिमेंट कंपनीला देण्यात आली.महसुली अभिलेखप्रमाणे ७/१२ मध्ये फक्त ४ हे.१७ आर. जमिन वनविभागाची असतांना ५८०.२२ हे.आर.वनविभागची जमिन मालकी नसतांना वनअधिकार्‍यांनी ताबा दिल्याचा कागदोपत्री नोंदी कच्चा कागदावर आहे.

मात्र वन पर्यावरण कायदा १९८० नुसार बांधकामाच्या व उत्खननाच्या मंजुरी संशयास्पद असून वनसडी परिक्षेत्रातील २५९.२३ हे.आर.व जिवती वनपरिक्षेत्रातील २२३.७५ हे. आर. अशी एकुण ४९३ हेक्टर जमिन कंपनीच्या ताब्यात असल्याचे उद्योग विभागाचे पत्र दि.३०/०४/२०१९ नुसार नोंदी आहेत. तसेच १५० हेक्टर जमिन वनविभागाला परत दिल्याचे ९/२/२०१९ च्या वनपरिक्षेत्र  अधिकारी यांच्या पत्रात नमुद आहे. तसेच उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशानुसार जिपीएस द्वारे मोजणी करुन पालीगाॅन मध्ये चार आदिवासी  बांधवाची जमिन कंपनीने बेकायदेशीर भूपृष्ठ अधिकार भुसंपादन न करता कंपनीने जमिन दडपवून आदिवासी बांधवांना भुमिहिन केल्याच्या तक्रारी पोलीसांना  करुणनही योग्य मार्गाने चौकशी करूण आदिवासी बांधवांना न्याय देण्याऐवजी उद्योजग कंपनीला रान मोकळे केल्याने राष्ट्रीय संपत्तीची मोठी हानी होत असतांना शासन वनसंपत्ती व चुनखडी उत्खननाकडे डोळेझाक करित असल्याचा आरोप आदीवासी कुटूंबानी केला आहे.

जिवती येथिल तत्कालीन तहसिलदार बेडसे पाटील यांनी आपले कर्तव्य व जबाबदारी झटकावून जे कार्य ३७ वर्षात आदिवासी बांधवानी संघर्ष करुणही शासन व जिल्हा प्रशासन आदीवासी बांधवाना न्याय देण्यासाठी करू शकले नाही,परंतु तेच काम जिवतीचे तहसिलदार आपल्या अधिकार क्षेत्राच्या बाहेर जाऊन वरिष्ठ कार्यालयाचे कोणतेही आदेश नसतांना तसेच मंडळ अधिकारी व तलाठी यांना दमदाटी करूण एकाच दिवशी कंपनीचा कायदेशीर मालमत्ता  नोंदी करण्याबद्दल वरीष्ठ कार्यालयाचे किंवा  शासनाचे आदेश नसतांना मानिकगड सिमेंट कंपनीचे ( दि सेच्युरी टेक्सटाईल ) यांचे नाव यांचे खारीज करु नये असे आक्षेप आदीवासी बांधवानी जिल्हाधिकारी तसेच उपविभागीय अधिकारी यांचेकडे केले असतांनाही तहसिलदार एवढ्या तत्परतेने कंपनी व्यवस्थापकांशी  संगनमत करुण दि.०३/०२/२०२१ रोजी अल्ट्राटेक सिमेंटच्या नावाने स्वता फेरफार पंजी हातात घेऊन जमिन आर्थिक महाघोटाळा असून अल्ट्राटेकचे नाव चढविल्याचा आरोप प्रकल्प बाधित आदीवासी यांनी केला.

गेल्या तिन वर्षात आदीवासीना वरीष्ठ कार्यालयाचे चौकशीचे अनेक पत्र धूळ खात असतांना साधी चौकशी न करणारे तहसिलदार व २०० एकर आदीवासीच्या जमिनीचा शेत सारा मानिकगड कंपनी कडुन वसुल करणारे अधिकारी अकृषक, औद्योगिक शेतसारा, भूपृष्ठ भाडे,अनाधिकृत रस्त्यावरील अतिक्रमण तसेच अनाधिकृत बांधकाम करणार्‍या  कंपनीवर कार्यवाही न करता तहसिलदार एकाच दिवशी फेरफार घेऊन तत्परतेने आदीवाश्यांचे शोषन करणार्‍या जिवती येथिल तहसिलदार बेडसे पाटील यांच्यावर अनु.जाती जमाती कायद्याअंतर्गत कार्यवाही करुण मानिकगड सिमेंट कंपनीच्या तक्रारीची गुन्हे अन्वेषण विभागाकडून  संपूर्ण चौकशी करावी अन्यथा येत्या २३ आगस्ट रोजी तहसिल कार्यालय जिवती येथे संपूर्ण आदीवासी जेलभरो आंदोलन तसेच जन सत्याग्रह संघटनेचे स. आबिद अली, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे कार्याध्यक्ष गजानन पाटील जुमनाके,पांडुरंग जाधव, ममताजी जाधव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कैलास राठोड, शरद जोगी, जमिर पटेल, बापूराव मडावी, अमर राठोड, संभू आत्राम, हिरामण उदे, लिंगु आत्राम यांनी दिला असून मोठ्या प्रमाणात पत्रकार परिषदेत आदीवासी उपस्थित होते.

————————————–
कुसुंबी आदीवासी समाजाच्या शोषनाला महसुल,पोलिस प्रशासन जबाबदार कंपनीवर कार्यवाही करा,२३ आगष्टला जेलभरो आंदोलन करणार –
*गजानन जुमनाके*,
*युवा कार्याध्यक्ष, गोंडवाना गणतंत्र पार्टी*
————————————-
तहसिलदार प्रशांत बेडसे पाटील यांनी कंपनीच्या नावाने
फेरफार दुरूस्ती भ्रष्ट व सेवाशर्ती कसूर करीत शेतकर्‍यांच्या आक्षेप असतांना एकतर्फी फेरफार गैरकायदेशिर याप्रकरणात अपिल दाखल केली आहे.
दोषीवर  कार्यवाही व्हावी :-
सय्यदआबीद अली
   अध्यक्ष
जन सत्याग्रह संघटना
————————————–
अल्ट्राटेक माणिकगड सिमेंट कंपनीच्या चौथ्या टप्पासाठी १९०  हेक्टर जमिन देण्यास प्रखर विरोध आहे,आदिवासी,बंजारा,कोलाम बाधित होऊ देणार नाही:-
   कैलाश राठोड
अध्यक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिवती

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!