रेगडी गावाकरिता नेहमी कार्य करणारे समाजसेवकाचे ग्रामपंचायत सरपंच,सचिव व सदस्यांनी मानले आभार…

1256

संपादक नितेश खडसे

गडचिरोली/चामोर्शी: तालुक्यातील रेगडी ग्रामपंचायत येथे
मागील आठवड्यापूर्वी लावलेल्या हाय मास्क लाईटचे कनेक्टिव्हिटी संबंधित कंत्राटदार यांनी काही अडचण असल्यामुळे कनेक्शन न जोडता त्यांनी काही दिवस उशीर होणार हे कारण दिल्यामुळे अखेर आज रेगडी येथील समाजसेवी पत्रकार प्रशांतभाऊ शाहा यांनी MSEB शी बोलून आपले सव खर्चने लेबर लावून दोनही हायमास्क लाईट सुरू केले व 33/11केव्ही रेगडी येथील नवीन उपकेंद्राचे रेगडी फिडर सुरू करण्यास भाग पाडले.

कारण मागील दीड ते दोन महिन्याअगोदर रेगडी येथील उपकेंद्राचे उद्घाटन झाले होते. सर्व काही सुरळीत असतांना सुध्दा तरी पण रेगडी या गावात 33/11 केव्ही रेगडी उपकेंद्रातून विद्युत पुरवठा देण्यात आली नव्हती.
रेगडी येथील 33/11 केव्ही उपकेंद्रात तीन फिडर दिलेले आहेत. रेगडी,माडेआमगाव,विकासपल्ली त्यामुळे समाज सेवक पत्रकार प्रशांत शाहा यांनी पाठपुरावा करून रेगडी येथील विद्युत पुरवठा सुरू करण्यास लावली.

ही सेवा सुरू केल्या बद्दल समाज सेवक प्रशांत शाहा यांचे सरपंच मोहिता लेकामी,उपसरपंच प्रवीण  मोहूर्ले,सदस्य बाजीराव गावडे,प्रवीण पोटावी,अश्विनी नेवारे,तोंदेश तलांडे,सचिव प्रकाश सलामे,पोलीस मदत केंद्र रेगडी येथील psi नंदकिशोर शिंब्रे,psi मगरे व आदींनी त्यांचे आभार मानले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिले. यावेळी पवन भांडेकर,तंत्रज्ञन नरेंद्र टेकाम व रितेश गाईन यांनी मोलाचे योगदान दिले त्या बद्दल त्यांचे पण आभार व्यक्त करण्यात आले.