वरोरा पोलिसांची जुगार अड्यावर धाड; नऊ लोकांना अटक…

0
246
Advertisements

वरोरा :- वरोरा पोलिसांना 22 जानेवारीला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोर्डा येथील प्रफुल जयस्वाल नावाचा इसम हा राहते घरी काही लोकांना सोबत घेऊन 52 तास पत्त्यावर जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्याने धाड घालण्यात आली असता 9 लोकांना रंगेहाथ जुगार खेळतांना पकडण्यात आले. पोलिस निरीक्षक श्री खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली.

जुगार अड्यावरुन 49, 470 रू व 7 मोटार सायकल ,9 मोबाईल असे एकूण कि 4,03,020 /- रु चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले.यातील 9 आरोपी इसमाविरुद्ध गुन्हा नोंद करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाही अरविंद साळवे , पोलीस अधीक्षक चंद्रपूर, प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, निलेश पांडे , उप विभागीय पोलीस अधिकारी वरोरा, यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक दिपक खोब्रागडे पो. स्टे. वरोरा यांचे अधिपत्यात सपोनि राहुल किटे, पोउपनी सर्वेश बेलसरे, सफो विलास बलकी, नापोशी किशोर बोढे, पोशी कपिल भांडारवार, पोशी सुरज मेश्राम, पोशी विशाल गीमेकर, पोशी दिनेश मेश्राम, पोशी महेश बोलगोडवार यांनी पार पाडली.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here