आनंदनिकेतन महाविद्यालय विविध पुरस्काराने सन्मानित…

93

आनंदनिकेतन महाविद्यालय विविध पुरस्काराने सन्मानित
सोळा विद्यार्थी गुणवत्ता यादीत

प्रतिनिधी संकेत कायरकर

वरोरा येथील आनंदनिकेतन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य डॉ.मृणाल काळे यांना गोडवाना विद्यापीठाचा उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार 30 सप्टेंबर 2025 ला जाहीर झाला. यासोबतच महाविद्यालयातील उत्कृष्ट विद्यार्थी म्हणून श्री. रुपेश कुत्तरमारे उत्कृष्ट विद्यार्थिनी कु.श्रुती धोटे यांनाही पुरस्कार जाहीर झाले.विशेष म्हणजे सलग तिसऱ्या वर्षी महाविद्यालयातील शारीरिक शिक्षण व क्रीडा विभाग यांना विद्यापीठाची जनरल चॅम्पियनशिप घोषित झाली.
अधिक आनंदाची बाब म्हणजे विद्यापीठाचा जिल्हा स्तरीय पुरस्कार महविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना युनिटला,कार्यक्रम अधिकारी प्रा.मोक्षदा नाईक व रासेयो स्वयंसेवक श्री.मयूर हनवते यांना जाहीर झाला.गोंडवाना विद्यापीठाच्या 14 व्या वर्धापन दिनानिमित्ताने 6 ऑक्टोबर 2025 रोजी होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार वितरीत केले जाणार आहेत.
1964 पासून सुरू झालेल्या महाविद्यालयाने आजही शैक्षणिक,सांस्कृतिक तथा सामाजिक क्षेत्रात उंची गाठली होती ती आजही कायम ठेवली आहे.
2016-17 पासून आनंद निकेतन महाविद्यालयात एम.एससी सुरू करण्यात आले.विशेष म्हणजे तेव्हापासून सातत्याने एम.एस.सी च्या परीक्षेमध्ये महाविद्यालयातील विद्यार्थी मेरिट लिस्ट मध्ये येत आहेत.अभिमानाची बाब म्हणजे सन 2024-25 या वर्षातही महाविद्यालयाच्या सोळा विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने एम.एससी, एम.ए,
एम.कॉम व बी.कॉम परीक्षांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवले. यावर्षी अभिमानाची बाब म्हणजे एम.एससी प्राणीशास्त्र व वनस्पतीशास्त्र या विषयात पहिल्या पाच मेरिट मधील चार विद्यार्थी महाविद्यालयाचे आहेत हे विशेष.
कु.इशिका धोटे, कु.रितू डेंगळे कु.सलोनी सिंग व कु.तृप्ती दडमल यांनी प्राणीशास्त्र या विषयात अनुक्रमे पहिला दुसरा तिसरा व पाचवा येण्याचा मान प्राप्त केला. एम.एससी वनस्पतीशास्त्र या विषयात कु.तेजस्विनी बोडेकर,कु. गोपिका देठे,कु,नंदिनी गैनवार,व कु.श्रुती सातभाई या अनुक्रमे पहिल्या तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या मेरिट आल्या.अधिक विशेष बाब म्हणजे एम.एससी इलेक्ट्रॉनिक्स या परीक्षेत गुणवत्ता यादीतील पहिले तीन मेरिट हे महाविद्यालयाचे आहे. कु.प्रतीक्षा बदकल,कु.अंबिका पिदुरकर, कु. निकिता मालेकर यांनी गुणवत्ता यादीत अनुक्रमे पहिला,दुसरा व तिसरा येण्याचा सन्मान प्राप्त केला.
एम.ए अर्थशास्त्र या विषयात महाविद्यालयाची कु. विशाखा डोंगरे हिने गुणवत्ता यादीत दुसरे स्थान पटकावले.
यासोबतच अभिमानाची बाब म्हणजे एम.कॉम मध्ये देखील तीन विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत येण्याचा सन्मान प्राप्त केला.कु.प्रीती पॉल, कु.वैष्णवी शास्त्रकार,कु.आरती शेंडे हे गुणवत्ता यादीत अनुक्रमे तिसऱ्या, पाचव्या आणि सातव्या स्थानी आहेत.
बी.कॉम चा श्री.ओम चवले हा विद्यार्थी ही गुणवत्ता यादीत सातवा आला आहे.
महारोगी सेवा समितीचे सचिव आ.डॉ. विकास आमटे, आनंदवन विश्वस्त मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मृणाल काळे, महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग, विद्यार्थी सर्वच जण विद्यार्थ्यांच्या या भरघोस यशाचे कौतुक करत आहे.