Homeचंद्रपूरगोंडपिंपरीगोंडपिपरी रस्त्याच्या कामात पाईपलाईन फुटली; पाच गावात पाणीटंचाई

गोंडपिपरी रस्त्याच्या कामात पाईपलाईन फुटली; पाच गावात पाणीटंचाई

गोंडपिपरी: गोंडपिपरी मार्गाचे काम करीत असतांना मुख्य पाईपलाईन फुटली.परिणामी पाच गावांचा पाणीपुरवठा ठप्प झाला. या पाचही गावात पाण्याची मोठीच टंचाई असते.ही बाब लक्षात येताच गुरबक्षाणी कंपनीने पुढाकार घेत पाचही गावात ट्रंकंरने पाणी पुरवठा सूरू केला आहे.

किरमीरी-हीवरा-पोडसा मार्गाचे काम गुरबक्षानी या कंपनीव्दारे सूरू आहे.या मार्गाचे काम करीत असतांना चेकबापुर पाणी पुरवठा योजनेची मुख्य पाईपलाईन फुटली. त्यामुळे कुडेनांदगाव,चेकनांदगाव, हेटीनांदगाव,टोलेनांदगाव, गुजरी या पाच गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाला.या पाचही गावात नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत नाही.पाणी पुरवठा बंद झाल्याने पाचही गावात भिषण पाणीटंचाई निर्माण झाली.

याची माहीती कंपनीचे व्यवस्थापक नागेश ठाकरे यांना मिळाली.त्यांनी लगेच गावात ट्रकंर पाठविले.मागील तीन दिवसापासून ट्रंकरचा पाण्याने गावकरी तहान भागवित आहेत.दरम्यान फुटलेल्या पाईपलाईनचा दुरस्तीतीचे काम सूरू असून लवकरच पाणी पुरवठा पुर्वरत सूरू होईल अशी माहीती ठाकरे यांनी दिली.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!