रेगडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध…सर्वच 9 ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध…

0
510

गडचिरोली जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
ग्रामीण भागाच्या विकासाकरिता महत्त्वपूर्ण असलेल्या ग्रामपंचायत . निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवट नंतर निवडणूकीत कोणाकोणात मुख्य लढत रगंणार की बिनविरोध उमेदवार निवडून येणार याकडे सर्वच ग्रामपंचायत सदस्याचे लक्ष लागले होते मात्र चक्क रेगडी ग्रामपंचायती मध्ये सर्वच 9 सदस्य बिनविरोध निवडून आल्याने रेगडी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. रावकरि ते गावकरी या म्हणीप्रमाणे गावकऱ्यांच्या सहकार्यातून गावात विकासाचे स्वप्न बघणाऱ्या जनतेच्या पुढाकारातून रेगडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यास पुढाऱ्यांना भाग पाडले आहे.एकीकडे चामोशी तालुक्यातील गावागावात निवडणुकीची धामधूम सुरू असताना एकमेकांविरोधात उमेदवार उभे ठेवून निवडणुकीचा फड सजला असताना गावाने बिनविरोध निवडणुका घेऊन समाजापुढे मोठा आदर्श ठेवल्याचे दिसून येत आहेत नऊ सदस्यीय ग्रामपंचायतीमध्ये बाजीराव गावडे, तोंदेश तलांडे,प्रवीण पोटावी,प्रवीण मोहुर्ले, सुरेखा गेडाम,अश्विनी नेवारे,मोहिता लेकामी, सरीता गोटा,ज्योती पोटावी हे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत चामोर्शी तालुक्याच्या शेवटच्या टोकाला असलेल्या रेगडी गावातील नागरिकांनी व स्थानीक पुढाऱ्यांनी समाजापुढे आदर्श ठेवला आहे.ग्रामपचायतीच्या निवडणूकी दरम्यान राज्यातील अनेक आमदारांनी बिनविरोध निवडणूकीता विकास निधी देण्याची घोषणा केली होती त्यातच गडचिरोली निर्वाचन विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवराव होळी यांनी बिनविरोध निवडणूक घेणाऱ्या ग्रामपंचायतींना दहा लाखाची निधी देण्याची घोषणा केली होती रेगडी ग्रामंपचायत निवडणूकीसाठी आमदार डॉ देवराव होळी यांच्या नेतृत्वात रेगडी येथील नागरिक स्थानिक असलेले बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुरेश शाहा यांनी पुढाकार घेऊन सर्वांशी चर्चा करून रेगडी येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला त्यासाठी रेगडी येथील नागरिकांनी मोठे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here