नितेश खडसे गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव असे महिला व बाल रुग्णालयात दररोज बाळांची प्रसूती होत असते, जिल्ह्यातील व इतर बाजूच्या एरिया मधील बहुतांश लोक सोईस्कर असल्यामुळे प्रसूती साठी स्थानिक दवाखाना कडे धाव घेतात. इथे असे निर्दशनास आलेले आहे की बाळ जन्म झाल्यानंतर सुद्धा बाळाचं जन्माचा दाखला वेळेवर मिळतं नाही, बाळ जन्मल्या नंतर महिना ओलांडून गेल्या नंतर सुद्धा बाळाचा जन्म दाखला मिळत नाही.
मुळे बाहेर गावाच्या पालकांना याचा नाहक त्रास सहन करावे लागत आहे, इथे दाखला वाटप करण्याचा दिलेल्या वेळपत्रका नुसार तिथे लोक दाखला साठी वाट पहात असतात पण ऑनलाइन काम असल्यामुळे आणि तिथे सतत च्या नेटवर्क सर्विस ची लिंक डाउन असल्यामुळे कार्यालयीन कामे वेळेवर होत नसल्यामुळे दाखला मिळायला उशीर होत आहे असे ऐकवण्यात येत आहे. तरीही जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाणे याची नोंद घ्यावी असे लोकांचे मत आहे.