वरोरा:– कोरोना च्या पुष्ठभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कुणीही उपाशी राहू नये , सगळ्यांना भाजीपाला मिळावा या साठी शेतकरी बांधव गाव सोडून शेतात राहायला गेला. उन्हातान्हात काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवत आहे, वीज वितरण कंपनी शेतकरयांना २४ तास वीज पुरवठा करत नसल्याने शेतकऱ्यांचे अतोनात हाल सुरु आहे . त्या साठी कृषी पंपाना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी भारनियमन बंद करण्याची मागणी अभिजित कुडे यांनी केली आहे .
शेतकरयांना दिवसा वीज पुरवठा होत नाही व त्यांना रात्री पाणी द्यायला जावे लागते रात्रीच्या कडाक्याच्या थंडीत पाणी द्यायला शेतकरयांना जावे लागत असून जंगली प्राणी, जीव जंतू यांच्या पासून जीवाला धोका असतो . शेतीत चना, गहू , ज्वारी व भाजीपाला लागवड केली असुन अखंडित वीजपुरवठा या मुळे शेतकरयांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे . शेतकरयांना २४ तास वीज पुरवठा करा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष वरोरा तालुका अभिजित कुडे यानी केली आहे . शेतकरयांना वीज पुरवठा व्यवस्थित केला नाहीं तर वरोरा येथे आंदोलन करू असा इशारा अभिजित कुडे यानी दिली आहे . या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे , पंकज मांडवकर, संकेत वानखेडे, रोशन भोयर, विनोद कोठारे, विनोद ऊरकुडे, विजय कुडे, ऋषिकेश पाटील, संकेत आत्राम व कार्यकर्ते उपस्थित होते.
२४ तास वीज पुरवठा द्या– अभिजित कुडे
Advertisements
Advertisements
Advertisements
Advertisements