Homeकृषीचिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला...

चिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला…

गौरव लुटे ( प्रतिनिधी)

आरमोरी: गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील रोवणी खोळंबली होती.धान पेरणी पासून अधूनमधून पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या हसु कायम होतं. पण ऐन पर्हे रोवणीसाठीतयार होवून,मधेच पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला . अगोदरचं आर्थिक विवंचनेत सापडलेल्या शेतकरी वर्गाला पुन्हा पावसाने सुध्दा दगा दिला .भाव वाढीचे प्रमाण लक्षात घेता ट्रॅक्टर चे आठशे रुपये प्रति तास व मजूरी दर गतर्षीपेक्षा यावर्षी जास्त आहे. बैलजोडी ने शेतात चिखल करण्याचे प्रमाण फार कमी पाहायला मिळत आहे.शेतातील पर्हे रोवणी साठी तयार झाले असतानाचं पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला ,ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय सुविधा उपलब्ध होती, त्यांनी सिंचनाच्या सुविधेने आपली रोवणे आटपून टाकली, परंतु पावसाच्या पाण्याच्या आसऱ्यावर जगणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती निराशाचं हाती पडली.रोवण्यासाठी पर्हे तयार झाले परंतू पाण्याअभावी पर्हे कोमेजायला लागली.वातावरण दमट झाले होते. शेवटी आज सकाळी आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरून आले व पावसाची संततधार सुरू झाली आणि बघता बघता मुसळधार पाऊस चांगलाच बरसला.त्यामुळे चिंतातुर झालेल्या शेतकऱ्यांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!