बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्याचा मनमानी कारभार ; कारवाईची मागणी

0
452

गोंडपिपरी (सुनील डोंगरे )-कार्यकारी संपादक

गोंडपिपरी येथील बँक ऑफ इंडिया शाखेच्या कर्मचाऱ्याने सारे नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार चालवून ग्राहकांना त्रास देण्याचे सत्र आरंभले आहे. सदर कर्मचाऱ्याला उचित समज देऊन कारवाई करण्याची मागणी एका व्यापाऱ्याने पत्रपरिषदेत केली आहे.
यासंदर्भात सविस्तर असे की ,अजितकुमार जैन हे गोंडपिपरीतील बडे व्यापारी आहेत. त्यांचे बँक ऑफ इंडिया वढोली शाखेत चालू खाते आहे. सध्याचे युग नेट बँकिंग चे आहे .आणि एखाद्या बँकेच्या कुठल्याही शाखेतून नेट बँकिंग चे व्यवहार करता येतात असा नियम आहे.
अजित जैन असा व्यवहार करण्यासाठी बँक ऑफ इंडिया गोंडपिपरी शाखेत गेले असता ,तुमचे ज्या शाखेत खाते आहे तिथून व्यवहार करा असे त्यांना बजावण्यात आले आणि त्यांची बोळवण करण्यात आली .जेंव्हा की हे पूर्णपणे नियमबाह्य आहे.
बँक ऑफ इंडिया गोंडपिपरी शाखेत नेहमीच ग्राहकांशी उद्धटपणे व्यवहार केला जातो .अजिबात सौजन्यपूर्ण व्यवहार नाही .
ग्राहकांशी उद्धटपणे व्यवहार करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याला उचित समज देऊन त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी अजितकुमार जैन यांनी पत्रपरिषदेतून केली आहे .यासंदर्भात त्यांनी बँक ऑफ इंडियाच्या विभागीय व्यवस्थापकाकडेही तक्रार धाडली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here