गडचिरोली- चांदाळा मार्गावरील गोटूल भूमी (जुनी कोळसा खदान ) समोरच्या झुडपी जंगल परिसरात सरपण जमा करणाऱ्या गरीब महिलेवर पट्टेदार वाघाने हल्ला करून तिला ठार मारल्याची घटना आज दि 16 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मुंबई येथे आमदार डॉ देवराव होळी यांना मिळताच यांनी तात्काळ गडचिरोली वनवृत्ताचे वरिष्ठ अधिकारी यांना दूरध्वनी करून सदर नरभक्षी पट्टेदार वाघास त्वरित जेरबंद करण्यासाठी यथाशीग्र उपाययोजना करून इंदिरानगर- चांदाळा रोड – पोटेगाव रोड – सेमाना देवस्थान च्या जंगल परिसरात पिंजरे लावून वाघाला त्वरित जेरबंद करण्याचे निर्देश वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
तसेच वाघाच्या हल्ल्यात मृत पावलेल्या सुधाताई चिलमवार यांच्या कुटुंबियांना शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत देण्याचे आमदार डॉ देवराव होळी यांनी आश्वासन दिले व आपण गडचिरोली येथे येताच सदर दुःख ग्रस्त कुटुंबाची भेट घेणार असे ते बोलले
Advertisements
वाघाच्या हल्ल्यात महिला ठार…
Advertisements
Recent Comments
Advertisements
Advertisements