ब्रम्हपुरी वनविभागातील ‘पिआरटी’ सदस्यांना ताडोबा-बफरच्या धर्तीवर द्यावे किमान मानधन…

367

चंद्रपुर: जिल्हयात मानव-वन्यप्राणी संघर्ष तिव्र असुन अशा परिस्थीतीत स्थानिक गावातील युवकांचे सहकार्य मिळवीता यावे म्हणुन प्रायमरी रिस्पाॅन्स् टिमचे महत्व असुन या युवकांना ताडोबा-बफर च्या धर्तीवर किमान मानधन देण्याची मागणी इको-प्रो चे अध्यक्ष तथा मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांनी पालकमंत्री विजय वडेटटीवार यांचेकडे निवेदनातुन केलेली आहे.

ब्रम्हपुरी वनविभाग अंतर्गत मानव-वन्यप्राणी संघर्ष शिगेला पोहचलेला असुन यापुर्वीच येथील मानव-वन्यप्राणी संघर्ष कमी व्हावा, कुठलीही घटना होताच स्थानिकांचा सहभाग मिळवीता यावा म्हणुन ब्रम्हपुरी वनविभागाने 2017 पासूनच मानव-वन्यप्राणी संघर्षाच्या दृष्टीने अतीसंवेदनशील असलेल्या 100 गावात त्याच गावांतील पाच-पाच युवकांची निवड करून प्राथमीक कृती दल-प्रायमरी रिस्पाॅन्स् टिम (पिआरटी) तयार करण्यात आलेल्या आहेत. अनेकदा या टिमचे वन्यप्राणी विषयक घटनात सहकार्य वनविभागास मिळत आहे. या पिआरटी सदस्यांना युनिफार्म व आवश्यक साहित्य देण्यात आलेले आहेत. सोबतच गावात कुठली वन्यप्राणी विषयक घटना घडल्यास वनकर्मचारी येण्यापुर्वी काय प्राथमीक कृती करावी याकरीता प्रशिक्षण वनविभागाच्या मदतीने इको-प्रो संस्थेच्या माध्यमाने मानद वन्यजीव रक्षक बंडु धोतरे यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षण सुध्दा देण्यात आलेले आहे. पिआरटी सदस्यांना मानव वन्यप्राणी संघर्ष निवारण कार्य करताना मात्र यांना कुठलाही मोबदला दिला जात नाही, ही युवंक आपल्या गावातील मानव-वन्यप्राणी घटना संदर्भात निस्वार्थपणे सेवा देत आहेत.

अलिकडे मागील दोन वर्षात ताडोबा-बफर क्षेत्रातील गावात सुध्दा पिआरटीचे गठण करण्यात आले आहे. बफर वनक्षेत्रातील गावांत सुध्दा अगदी योग्यरित्या या टिमचे कार्य सुरू आहे. या युवकांना महीन्याकाठी 1 हजार रूपये मानधन दिले जाते, यंदा वाढवुन 1200 रूपये देण्यात येत आहे. या मानधनातुन मिळालेले प्रोत्साहन म्हणुन या वनक्षेत्रात सकारात्मक प्रयत्न दिसुन येत आहे. ताडोबा बफर अतंर्गत व्याघ्र फाउंडेशन मधुन मानधन दिले जात आहे मात्र प्रादेशीक वनविभाग कडे अशी कुठलीही तरतुद नसल्याने ब्रम्हपुरी वनविभागातील या युवकांना सुध्दा ताडोबा-बफरच्या धर्तीवर किमान एक हजार रूपये मानधन देण्याकरीता ‘जिल्हा विकास व नियोजन निधी’ मधुन तरतुद करण्यात आल्यास ब्रम्हपुरी सारख्या सर्वाधीक मानव-वन्यप्राणी संघर्ष असलेल्या वनव्याप्त व वनालगतच्या गावात स्थानीक युवकांचे सहकार्य कठीण प्रसंगी घेणे सहज होईल. याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची मागणी सदर निवदेनातुन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचेकडे करण्यात आली आहे.