मुख्य संपादक मुन्ना तावाडे /
महाराष्ट्र राज्य शासनाने आपले सरकार योजनेत ई-ग्रामसॉफ्ट ही संगणक प्रणाली तयार केली आहे. ‘आपले सरकार सेवा केंद्र ’ अंतर्गत जिल्ह्यातील 847 ग्रामपंचायती पैकी 311 ग्रामपंचायती पेपरलेस,झाल्या आहेत.उर्वरीत ग्रामपंचायत पेपरलेस होण्याचा मार्गावर आहेत.
ग्रामीण भागात उदभवणाऱ्या परिस्थितीवर मात करीत जिल्ह्यातील 311 ग्रामपंचायती पेपरलेस झाल्या आहेत.पेपरलेस झालेल्या ग्रामपंचायतीची सर्व कामे ऑनलाईन पद्धतीने सुरु आहेत. या ग्रामपंचायतीनी ‘आपले सरकार’ योजनेतील ई-ग्रामसॉफ्ट नावाची संगणक प्रणाली बनवली आहे. त्यामुळे संबंधीत ग्रामस्थांना ३३ प्रकारचे दाखले ग्रामपंचायत मधून ऑनलाईन प्राप्त होत आहेत. यातच सर्वच ग्रामपंचायतीचे काम पेपरलेस करण्याचा मानस जिल्हा परिषदेचा आहे. डीजीटल इंडियाच्या संकल्पनेतून ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाज ऑनलाईन करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहेत. आर्थिक व्यवहारासह विविध नोंदी संगणकावर सुरु झाल्या आहेत. यासाठी ग्रामपंचायतीचे १ ते ३३ प्रकारचे नमुने संगणकाद्वारे देण्यासाठी ग्रामविकास विभागाने आपले सरकारच्या सेवा केंद्रातील ई-ग्रामसॉफ्ट विकसित केले आहे.
ग्राम विकास विभागाच्या आदेशानुसार १ एप्रिल पासून या आदेशाची काटेकोर अमलबजावणी करण्यात येत आहे. ‘आपले सेवा सरकार केंद्र’ या प्रकल्पाचे प्रमुख उदीष्ट ग्रामपंचायत स्तरावरून आयटी संसाधनाच्या सहाय्याने महाराष्ट्रतील सर्व ग्रामपंचायत संगणकीकृत करणे, या सोबतच नागरिकांना त्यांच्या रहिवासी क्षेत्रात सेवा देणे, कामकाजात पारदर्शकता आणली जाणार आहे.वार्षिक कर मागणी, वसुलीसाठी कामाचे देयक, मोजमाप वही, ग्रामपंचायत लेखा परीक्षण पूर्तता वही त्यावर मालमत्ता माहिती , रस्त्याची माहिती, जमिनीचे नोंदणी पुस्तक, कर्मचारी पगारपत्रक, कामाचे देयक, कामाचे अंदाजपत्रक नोंदवही, वार्षिक कर पावतीचे कामे इत्यादी ई-ग्रामसॉफ्ट मध्ये झाली आहे. त्यामुळे त्याचा कारभार आता पेपरलेस बनला आहे. मालमत्ता कर, रहिवासी, वीज जोडणीसाठी ना-हरकत प्रमाणपत्र, शौचालय दाखला, विवाह नोंदणी दाखला, हयातीचा दाखला, वयाचा दाखला व असे विविध दाखले या माध्यमातून ऑनलाईन दिले जात आहेत. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या हस्तलेखी नोंदी बंद करण्यात आल्या असून सर्व प्रकारचे दाखले आता संगणकीकृत पद्धतीने देण्यात येत आहेत. केंद्र शासनाच्या ई-ग्राम अभियानाअंतर्गत ग्रामपंचायतीचे कामकाज राज्य शासनाने आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून हे काम हाती घेतले आहे.
गावकऱ्यांच्या सोयीसाठी आणि पारदर्शक सेवेसाठी पेपरलेस प्रणाली अत्यंत योग्य आहे. यामुळे कामे वेळेवर होत आहेत. ही संकल्पना संपूर्ण ग्रा.पं.ने राबवावी.