दारू तस्करांच्या गेला तोल आणि रस्त्यावर सगळीकडे दारूच-दारू

0
805

राजेंद्र झाडे(प्रतिनिधी)

गोंडपीपरी:चंद्रपुर जिल्ह्यात सर्वत्र दारूबंदी असतांना सुद्धा आज सायंकाळच्या सुमारास धाबा येथील दारूतस्कर तेलंगणा येथून दारू पिऊन आणि सोबत दारू घेऊन येत होता.
गावाजवळ येताच बाईक वरून त्यांचा तोल गेला अन जवळपास चार पेटया दारूचा सडा रस्त्यावर पडला. या घटनेची माहिती उप पो स्टे धाबा यांना मिळाली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून माल जप्त केला.

चंद्रपुर जिल्ह्यात दारूबंदीला पाच वर्षे लोटली पण सर्रासपणे दारू विक्री सुरू आहे. गोंडपीपरीला लागूनच तेलंगणा राज्याची सिमा आहे. छूप्या मार्गाने दारू तस्करी होते. याचा फायदा घेत धाब्यातील काही दारू तस्कर दिवसा-ढवळा दारू तस्कर करणे चालू केले आहे. या दारू तस्करांना पाठींबा तरी कुणाचा हि चर्चा सध्या गावात चालू आहे.

सविस्तर माहिती अशी कि आज सायंकाळच्या सुमारास दारू तस्कर तेलंगणा येथून बाईक ने दारू धाबा येथे घेऊन येत होता. दारू तस्करी करताना त्यांनी बरीच दारू ढोसली होती आणि गावाजवळ येताच बाईकवरुन त्याचा तोल गेला. जवळपास चार पेट्या दारुचा सडा मार्गावर पडला या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली.

रस्त्यावर पडलेला दारू साठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी दारू तस्कर प्रवीण घोगरे याला ताब्यात घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here