पोलीस जवानाच्या खूनाचा आरोपी असलेल्या नक्षलवाद्यास जन्मठेप…

0
439

          गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर पोलीस मदत केंद्राअंतर्गत कोपेला येथे एका पोलीस दलातील जवानाची हत्या करणा-या नक्षलवादी असलेल्या आरोपीला नुकतीच  जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेप व 6 हजार रु. दंडाची शिक्षा सुनावली आहे.प्लॉटुन १५ चा कमांडर डुंगा ऊर्फ येशु ऊर्फ वसंतराव बापु टेकाम असे शिक्षा झालेल्या नक्षलवाद्यांचे नाव आहे.
२८ सप्टेंबर २००९ रोजी आपल्या मुळ गावी मौजा कोपेला येथे दसरा सण साजरा करण्याकरीता गडचिरोली येथुन पोलीस दलात कार्यरत असलेले नागेश पापया पायाम हे आपल्या घरी हजर असताना  नक्षलवादी बंदुकीची गोळी मारुन निघृण खून केला तसेच फिर्यादीची लहान बहीन सुनिता हीला सुध्दा डोक्यावर व कमरेवर बंदुकीच्या गोळीने मारुन खून केला.
यासंदर्भात 29 सप्टेंबर  रोजी उपपोस्टे झिंगानुर येथे फिर्याद दाखल करुन तपासात घेतला. गडचिरोली पोलीस दलाने तपासाची चक्रे वेगाने फिरवत नक्षलवादयांच्या प्लॉटुन १५ चा कमांडर नामे- डुंगा ऊर्फ येशु ऊर्फ वसंतराव बापु टेकाम वय-34 वर्षे रा.
कापेचंचा ता. अहेरी जि. गडचिरोली यास अटक केली.
गुन्हयाचा तपास पोउपनि मंगेश नंदकुमार जगताप उपपोस्टे झिंगानुर यांनी तपास पुर्ण करुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा मिळुन आल्याने  जिल्हा व सत्र न्यायालय गडचिरोली येथे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय-3 यांचे न्यायालयात चालविण्यात आला.
न्यायालयाने फिर्यादी व साक्षीदारांचे बयान नोंदवुन आरोपीविरुध्द सबळ पुरावा मिळुन आल्याने व सरकारी वकीलाच्या युक्तिवाद ग्राहय धरुन  जिल्हा व सत्र न्यायाधिश-3  बी. एम. पाटील यांनी आरोपीस भादंविच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेप व 5 हजार रु. दंड 148 भादंविमध्ये 3 वर्ष 1000/- रु. दंडाची शिक्षा सुनावली.
सदर गुन्हयाचा तपास उपपोस्टे झिंगानुरचे पोउपनि मंगेश नंदकुमार जगताप यांनी केला. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी अभियोक्ता  एन. एम. भांडेकर यांनी बाजु मांडली कोर्ट पैरवी म्हणुन पोउपनि नारायण बच्चलवार यांनी काम पाहीले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here