शेतामध्ये निघालेल्या बारा फुटांच्या अजगराला वनविभागाने दिले जीवनदान

0
440

 

राजेंद्र झाडे

गोंडपिपरी:
सगळीकडे सध्या कापणी, वेचणी चा हंगाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अश्याच काल गोंडपीपरी तालुक्यातील धाबा या गावातील साजन झाडे यांच्या शेतात कापूस वेचणी सुरू होती. कापूस वेचणी सुरू असतानाच एक भला मोठा अजगर मजुरांना दिसल्याने मजुरांना घाम फुटला. सर्वत्र आरडाओरड झाली.
त्यांनतर ही बातमी वनरक्षक ठाकरे यांना ही देण्यात आली. ठाकरे यांनी निसर्ग सखाचे संस्थापक अध्यक्ष दीपक वांढरे यांना भ्रमणध्वनी करून त्यांना घटनास्थळी बोलविले. ही माहिती मिळताच वांढरे यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठून मोठ्या प्रयत्नाने अजगराला पकडले.
शेतात निघालेल्या अजगराला वनविभागाने मोठ्या प्रयत्नाने बंदीस्त केले. पकडलेला अजगर बारा फुट लांबीचा होता. पकडण्यात आलेल्या अजगराला खुल्या वनक्षेत्रात सोडण्यात आले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here