भावपूर्ण श्रद्धांजली! मुल पंचायत समिती सदस्य आणि काँग्रेस नेते संजय पाटील मारकवार यांचे अपघाती निधन

0
491

मुल पंचायत समितीचे सदस्य, संजय गांधी निराधार योजना समिती अध्यक्ष मूल, तसेच शेतकऱ्याचा प्रश्नांना वाचा फोडणारे, राजकारणापलीकडे सर्वाशी प्रेमाने जाते जपणारे मा संजय पाटील मारकवार यांचे काल सायंकाळी अपघाती निधन झाले.

काल सायंकाळी ते आपल्या दुचाकीने सावली-गोंडपीपरी या मार्गाने जात असताना अचानक त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे ऍडमिट करण्यात आले पण तिथेच त्यांनी प्राणज्योत मावळली.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, पंचायत समितीचे सदस्य या पदांच्या माध्यमातून
संजय पाटील मारकवार यांनी गेली अनेक वर्षे जनतेची सेवा केली. सहृदय मित्र, कार्यतत्पर लोकप्रतिनिधी म्हणून ते लोकप्रिय होते. त्यांच्या निधनाने सामाजिक व राजकीय क्षेत्राची हानी झाली आहे. तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते असल्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा शोक व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यातून सावरण्याचे बळ परमेश्वर देवो.
भावपूर्ण श्रद्धांजली……💐

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here