वाघ शोधायला गेलेल्या वनकर्मचाऱ्यावर मधमाश्यांचा हल्ला; वनकर्मचाऱ्यासह तीस गावकरी जखमी

0
361
Advertisements

शेखर बोंनगिरवार तालुका प्रतिनिधी

गोंडपीपरी:वाघ शोधायला गेलेल्या वनकर्मचार्यावर मधमाश्यांनी हल्ला केला.या हल्यात वनकर्मचार्यासह तीस गावकरी जखमी झालेत.ही घटना गोंडपिपरी तालुक्यातील शिवणी परिसरात रविवारला दुपारचा सूमारास घडली.

Advertisements

गोंडपिपरी तालुक्यात येणाऱ्या शिवणी संगमाचा मध्यभागी बेट आहे.या बेटावर शिवणी गावातील शेतकऱ्यांची शेती आहे. या बेटात काही शेतकऱ्यांना वाघ दिसला.त्यांनी याची माहीती वनविभागाला दिली. वनकर्मचार्यांनी घटनास्थळ गाठून शोधमोहीम सूरू केली.वनकर्मचार्यांचा सोबतीला गावकरीही होते. शोधाशोध सूरू असतांना मधमाश्यांनी अचानक हल्ला केला. अचानक झालेल्या हल्यानी शोध घेणारी टिम बिथरली. पळापळ सूरू झाली. या धावपळीत काही जखमी झालेत.बचावासाठी काहीनी नदी पात्रात उडी घेतली. टिम मधिल पंचवीस ते तीस लोकांना मधमाश्यांनी चावा घेतला आहे. या घटनेत जखमी झालेल्याना ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

वाघ दिसलाच नाही

वैनगंगा-वर्धा नदीचा संगमात असलेल्या हा बेट चपराळा अभयारण्यला लागुन आहे. अभयारण्यातून वाघ आला असावा असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे.मात्र शोधमोहीमेत वाघ अथवा वाघाचे पगमार्क आढळून आले नाहीत.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here