Advertisements
Home नागपूर नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अभिजीत वंजारी विजयी

 

नागपूर, दि. 4 : नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांना आज शुक्रवारी दुपारी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ संजीव कुमार यांनी विजयी घोषित केले आहे.
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत पहिल्या पसंतीच्या एकूण वैध मतांच्या मतमोजणी नंतर विजयासाठी मताचा कोटा निश्चित करण्यात आला होता. उमेदवारांना मिळालेल्या पहिल्या पसंतीच मतांमध्ये विजयासाठी कोटा पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे एकल संक्रमण प्राधान्यक्रम पद्धतीनुसार ( इलिमेशन ) बाद फेरीतील दुसऱ्या क्रमांकाच्या पसंती क्रमानुसार 17 व्या फेरीनंतर अभिजीत वंजारी यांनी विजयासाठीचा निर्धारित मताचा कोटा पूर्ण केला. यासाठी 17 व्या फेरीपर्यत अन्य उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी करण्यात आली.
मानकापूर येथील विभागीय क्रीडा संकुलात काल गुरूवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणीला प्रारंभ करण्यात आला. मतमोजणी तब्बल 30 तासांपेक्षा अधिक काळ सुरू होती. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनात नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यातील जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या मतमोजणीला उपस्थित होते.
कोरोना संक्रमण काळातील या निवडणुकीत कडेकोट प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यात आल्या होत्या मतमोजणी केंद्रांमध्ये मास्क, हातमोजे, सॅनीटायझर व सुरक्षित अंतर पाळण्यावर कटाक्ष होता. 28 टेबलवर ही मतमोजणी करण्यात आली. मतदान पूर्णता मतपत्रिकाद्वारे असल्यामुळे गुरुवारी सकाळी टपाली मतदान व मतपेट्या मधील मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. मतपत्रिकांची सरमिसळ करून प्रत्येक टेबलवर एक हजार मत पत्रिका मतमोजणीस देण्यात आल्या. या मतमोजणी दरम्यान प्रत्येक टेबलवर एक हजार याप्रमाणे प्रत्येक फेरीला 28 हजार मतांची मोजणी करण्यात आली. पहिल्या चार फेऱ्या प्रत्येकी 28 हजारांच्या तर पाचवी फेरी 21 हजार 53 मतांची झाली.
पदवीधरांच्या या निवडणुकीत एकूण टपाली व मतपेटीतील मते मिळून 1 लक्ष 33 हजार 53 मतदारांनी मताधिकार बजावला. त्यातील 11 हजार 560 मते अवैध ठरली. वैध ठरलेल्या 1 लक्ष 21 हजार 493 मतांचा एकल संक्रमण प्राधान्यक्रम निवडणूक पद्धतीनुसार कोटा काढण्यात आला. यानुसार एकूण वैद्य मत भागीला दोन अधिक एक अशा सूत्रानुसार 60 हजार 747 मतांचा कोटा ठरला.
तथापि, पसंतीक्रमाच्या या निवडणुकीमध्ये अपेक्षित असणारा 60 हजार 747 चा कोटा कोणताही उमेदवार पूर्ण करू शकला नाही. (अभिजीत गोविंदराव वंजारी पहिल्या पसंतीची एकूण मते 55 हजार 947, संदीप जोशी एकूण मते 41 हजार 540, अतुल कुमार खोब्रागडे 8 हजार 499, नितेश कराळे 6 हजार 889 मते मिळाली ) विजयासाठी निश्चित केलेला मतांचा कोटा पूर्ण न करू शकल्यामुळे या निवडणुकीतील मतमोजणीचा भाग क्रमांक २ अनुसार इलिमेशन फेरी सुरु करण्यात आली. त्यानुसार दुसऱ्या पसंतीक्रमाची मते इलिमिशन फेरी नुसार मोजणीला घेण्यात आली. एलिमिनेशन पद्धतीचा अवलंब करुन ही मतांची तूट भरून काढण्यात आली. त्यानंतर दुपारी अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. संजीव कुमार यांनी अभिजित वंजारी यांना विजयी घोषित केले. यावेळी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय व मत्स्य संवर्धन तथा क्रीडामंत्री सुनील केदार, काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र महासचिव किशोर गजभिये सर. खासदार कृपाल तुमाने, आमदार विकास ठाकरे, आमदार राजू पारवे, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
तत्पूर्वी पाचव्या फेरी अखेर पहिल्या पसंतीच्या मतमोजणीमध्ये अभिजीत वंजारी 55 हजार 947, संदीप जोशी 41 हजार 540, राजेंद्रकुमार चौधरी 233, इंजीनियर राहुल वानखेडे 3 हजार 752, ॲड. सुनिता पाटील 207, अतुलकुमार खोब्रागडे 8 हजार 499, अमित मेश्राम 58, प्रशांत डेकाटे 1 हजार 518, नितीन रोंघे 522, नितेश कराळे 6 हजार 889, डॉ. प्रकाश रामटेके 189, बबन तायवाडे 88, ॲड. मोहम्मद शाकीर अ. गफ्फार 61, सी.ए. राजेंद्र भुतडा 1 हजार 537, प्रा.डॉ. विनोद राऊत 174, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल 66, शरद जीवतोडे 37, प्रा.संगीता बढे 120 आणि इंजीनियर संजय नासरे यांना 56 मते पडली होती. या निवडणुकीत एकूण वैध मते 1 लक्ष 21 हजार 493 ठरली. 11 हजार 560 मते अवैध ठरली.
तर इलिमेशन पध्दतीच्या 17 व्या फेरीअखेर अभिजीत वंजारी यांना 61 हजार 701, संदीप जोशी 42 हजार 791 , अतुल कुमार दादा खोब्रागडे यांना 12 हजार 66 मते मिळाली.

Advertisements
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

मूत्रपिंडाच्या प्रतीक्षेतील शिक्षकाकडूनच अवयवदान

नागपूर: उद्याचे आदर्श नागरिक घडवित असताना एका शिक्षकाने मरणानंतरही अवयवदान करून समाजासमोर एक आदर्श ठेवला. सुरुवातीला करोना व त्यानंतर विविध कारणाने मूत्रपिंड उपलब्ध न झाल्याने वणीतील...

‘वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा’ हे पुस्तक मलेशिया येथे प्रकाशित होणार

नागपूर : 'वामनदादांच्या भावगीतातील आंबेडकरवादी जाणिवा' हे जयंत साठे लिखित समीक्षणात्मक पुस्तक असून या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा तीन फेब्रुवारी 2023 रोजी मलेशिया येथील आंबेडकरवादी...

प्रचंड मेहनत हेच यशाचे सूत्र – श्री लीलाधर पाटील 

दिनेश मंडपे कार्यकारी संपादक नागपुर - डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी प्रादेशिक कार्यालय नागपूर मार्फत मा. धम्मज्योती गजभिये (महासंचालक बार्टी पुणे) यांच्या...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

चंद्रपूर-नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या परिवर्तनाची प्रक्रिया पूर्ण करून विकास करा… खासदार बाळू धानोरकर यांची केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मागणी…

चंद्रपूर : चंद्रपूर-नागपूर या राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राज्य मार्ग म्हणून देखभालीचे काम केले जात आहे. त्यामुळे...

अन्नपुरवठा मधील भ्रष्ट अधिकाऱ्यांना निलंबित करा- आम आदमी पार्टीच्या महिला अध्यक्ष ॲड. सुनिता पाटील यांची मागणी..

चंद्रपूर -आम आदमी पार्टी चंद्रपूर अध्यक्ष ऍड सुनीता पाटील यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या गोरगरीब जनतेचे धान्यावर डल्ला मारणाऱ्या दुकानदारावर व त्या दुकानदाराला शह...

अभिनंदन! पुजा डोंगेची अखिल भारतीय आंतरविद्यापीठीय वूशू स्पर्धेसाठी निवड

चंद्रपूर (कोरपना) : नुकत्याच पार पडलेल्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या आंतर महाविद्यालयिन वूशू स्पर्धेत कवठाळा या छोट्याश्या गावातून कठीन परिश्रम घेत खेळाडू कु. पुजा गणपत...

गोंडवाना विद्यापीठ सभागृहाच्या “डीडोळकर’ नामकरणाला स्थगिती

: माजी मंत्री वडेट्टीवारांच्या पत्राची गंभीर दखल गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाच्या सभागृहाला स्व.दत्ता डिडोळकर नाव देउन आदिवासी समाजातील थोर हुतात्मे तथा आदिवासी समाजाच्या भावना दुखावणारा ठराव...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!