Home आंतरराष्ट्रीय Mumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील 'या' दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस

Mumbai Terror Attack मुंबई हल्ल्यातील ‘या’ दहशतवाद्यावर अमेरिकेचे ५० लाख डॉलरचे बक्षीस

 

मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या साजिद मीरवर अमेरिकेने ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. साजिद हा लष्कर-ए-तोयबाचा सदस्य असून तो पाकिस्तानमध्ये असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेला साजिद मीरवर अमेरिकेने मोठे बक्षीस जाहीर केले आहे. साजिदवर अमेरिकेने तब्बल ५० लाख डॉलरचे बक्षीस जाहीर केले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला नुकतीच १२ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात १६० हून अधिकजण ठार झाले होते. मृतांमध्ये भारतीयांसह इतर देशांच्या नागरिकांचा समावेश आहे.
साजिद मीर हा पाकिस्तानमधील लाहोरचा राहणारा आहे. एफबीआयच्या मोस्ट वॉन्टेड लिस्टमध्येही साजिदचा समावेश आहे. मुंबई हल्ल्याचा तपास सुरू असताना साजिद मीरचे नाव समोर आले. साजिद मीर हा लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेचा वरिष्ठ सदस्य आहे.एफबीआयच्या वेबसाइटवर साजिद मीरचा वेगवेगळ्या पद्धतीने फोटो आहे. तपाय यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, साजिद मीर हा सहजपणे आपला चेहरा बदलू शकतो. त्याशिवाय तो आपल्या खऱ्या नावांऐवजी अनेक खोट्या नावाने वावरतो. यामध्ये इब्राहिम, वासी, खालिद, वसीभाई, अली भाई, मूसा भाई, साजिद माजीद, भाई मूसा, इब्राहिम शाह, आदी नावांचा समावेश आहे. त्याला हिंदी, उर्दू, इंग्रजी आणि अरबी भाषेचे ज्ञान आहे.. साजिद मीर सध्या पाकिस्तानमध्येच लपून बसला असल्याची माहिती तपास यंत्रणांना दिली. दरम्यान, दुसरीकडे मु्ंबई झालेल्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित असलेला पाकिस्तानी वंशाचा कॅनडातील व्यावसायिक तहव्वूर राणा याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) प्रत्यार्पण कारवाई सुरू केली आहे. एनआयएची चार सदस्यीय पथकाने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात अमेरिकेत प्रशासनाची भेट घेऊन प्रत्यार्पणाबाबत चर्चा केली.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता…स्वनियमन संस्थेशी संलग्न असलेल्या इंडिया दस्तक न्यूज...

नवीदिल्ली (प्रतिनिधी) भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल...

दोन अधिकारी सापडले लाचलुचपत प्रतिबंधक विभागच्या जाळ्यात…एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा गटविकास अधिकारी…

बीड: दोन वर्गमित्र , दोघेही प्रशासकीय अधिकारी एक उपजिल्हाधिकारी तर दुसरा पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. मात्र हेच दोन मित्र सर्वत्र आज चर्चेचा...

लिलाव तर झाले नाही… मग नवीन बांधकामास रेती येतेय कुठून…?

नागेश इटेकर गोंडपिपरी, तालुका प्रतिनिधी गोंडपिपरी :- तालुक्यातील रेती घाटाचे अजूनही लिलाव झाले नाही. मग तालुक्यात नवीन निवासाचे बांधकाम करण्यात येत असलेल्या ठिकाणी रेती येतेय तरी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विठ्ठलवाडा-आष्टी मार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे.. ए.जी कंन्ट्रक्शनच्या कामाची चौकशी करा-शिवसेनेची मागणी

गोंडपिपरी - गोंडपिपरी तालुक्यात सर्व बाजूने रस्त्याच्या बांधकामाचा धडाका सुरू आहे.अशातच तालुक्यातील विठ्ठलवाडा ते आष्टी मार्गाच्या रस्त्याचे अंदाजे ४५ कोटी रुपयांचे बांधकाम ए. जी...

101 सुरक्षा रक्षक सिएसटिपीएस मध्ये होणार पुर्ववत रुजु…आ. किशोर जोरगेवार यांनी घडवून आणली कामगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची मुंबई येथे बैठक…

चंद्रपुर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या सातत्याचा पाठपुरावा आणि प्रयत्नांनतर सिएसटीपीएस येथील नोंदणीकृत 101 सुरक्षा रक्षकांची नौकरीसाठी सुरु असलेली सहा वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार आहे....

एसटी महामंडळ बसच्या धडकेत युवक ठार…गडचांदूर जवळील घटना…

राजुरा: राजुरा कोरपना आदिलाबाद जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. 353 ब हा अपघात प्रवण महामार्ग झाला असून दोन दिवसांपूर्वी राजुरा येथील महिला प्राध्यापिका वनिता चिडे...

बेलतरोडी अग्नितांडवातील पीडितांना 15 ताडपत्री धम्मदान.. ‘द डिवाईन ग्रुप‘चा अभिनव उपक्रम

नागपूर : गेल्या आठवडयात बेलतरोडी परिसरातील महाकाली नगर झोपडपट्टीला सिलिंडरच्या विस्फोटातील भिषण आगीत शेकडो झोपडया भक्ष्यस्थानी झाल्याने हजारो नागरिक उघडयावर पडले. सोमवारी महाकारूणीक तथागत...

Recent Comments

Don`t copy text!