✍️प्रमोद दुर्गे
गोंडपीपरी तालुक्यात रेती तस्करानी धुमाकुळ घातला असून रात्रौ न दिवस वैनगंगा नदी पात्रातुन रेती तस्करी सुरू आहे. लिलाव करण्यात आलेल्या रेती महसुल विभागाने घाटावरून न हलवता तिथेच ठेवल्याने रेती तस्कराना सुगीचे दिवस आले आहेत. लिलावाच्या नावाखाली रेतीची मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे.
अस असतांना सुद्धा महसुल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहे. मागील एक महिन्यापासून रेती चा अवैध उपसा सुरू असल्याने महसुल विभाग सदर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.
रात्रौ न दिवस रेती ची ट्रॅक, ‘हा य वा’ मध्ये रेती भरून विठ्ठलवाडा मार्गे गोंडपीपरी पोलिस स्टेशन आणि तहसील कार्यालयसमोरून जात असतात तरी सुद्धा प्रशासन कारवाई करीत नसल्याने सदर प्रकार पूर्वनियोजनातून व ‘अर्थ राजकारणा’ तून सुरु असल्याची जनतेत खमंग चर्चा सुरू झाली आहे.
रेती साठा जप्त केल्या नंतर लिलाव प्रक्रिया पार पडली पण सदर ठिकाणी 900 ब्रास रेती उपलब्ध नसल्याने लिलाव रद्द करण्यात आला होता पण त्यानंतर लिलाव कधी करण्यात आला आणि किती ब्रास रेती चा लिलाव केला याची अजून जनतेला माहितीच नाही लिलाव झालं असेलही तरी सुद्धा मागील पंधरा वीस दिवसापासून ट्रॅक आणि हाय वा तुन रेतीची वाहतूक केली जात आहे तरी सुद्धा अजूनपर्यंत जप्ती केलेल्या लिलावाची रेती अजून पर्यन्त संपत नसल्याचे निदर्शनास येत आहे.
घाटालगत ठीकठिकाणी रेती चा साठा केला आहे. लिलावाच्या नावाने रेतीची लयलूट सुरू आहे. जप्ती केलेली राखून ठेवत नदी पात्रातून रात्रौच्या सुमारास रेती उपसा केलेली रेतीची वाहतूक केली जाते आणि लिलावाची रेती कायम ठेवली जात असल्याने रेती तस्करीस गोंडपीपरी तालुका प्रशासन व महसुल विभाग पाठबळ मिळत आहे. लिलावाच्या नावाने रेती तस्करी सुरू जोमाने सुरू असून शासनाची फसवणूक होत आहे. त्यामुळे या रेती तस्करी वर आळा बसविण्याची मागणी जोर धरू लागली आहे.