वाघाच्या हल्ल्यात दोन बकऱ्या ठार, एक जखमी

0
489

राजेंद्र झाडे
गेल्या सात आठ महिन्यापासून परिसरात सतत वाघाची दहशत चालू आहे. बकऱ्या,जनावर चरायला गेले की, सायंकाळी जनावरे सुखरूप येतील की नाही याची चिंता मालकांना असते. कारण दोन चार दिवसाच्या आड परिसरामध्ये वाघ मुक्या प्राण्यांवर हल्ला करून त्यांना मारत आहे.
काल सायंकाळी अंदाजे पाच वाजता पारगाव परीसरात पुन्हा असाच एक प्रकार घडला. पारगाव येथील बकऱ्या चराईसाठी गेले असता तिथे दबा धरुन बसलेला वाघाने हल्ला केला. यांत दोन बकऱ्या जागीच ठार झाल्या असून एक बकरी जखमी आहे.ह्यात कालीदास घोडाम यांची एक आणि अर्जून आलाम यांच्या दोन बकऱ्या आहेत. वारंवार वाघाच्या दहशतीच्या बातमी येत आहे तरी पण वनकर्मचारी यांनी जनजागृती केलेली नाही.

Advertisements

वाघाने प्रत्येक वेळी जनावरांना ठार करण्याचा निर्णय घेतला कि अजून किती वाघ आहेत? बकरीची चराई नसल्यामूळे आम्हाला आर्थीक मदत पण मिळत नाही. आम्ही संकटकाळी बकऱ्या विकुन आमचे पोट भरतो. हि व्यथा सांगायचे तर कुणाला ही खूप मोठी अडचण आमच्यावरती आलेली आहे. आज आमच्या बकऱ्या मेल्या पून्हा हा प्रकार घडू नये, या साठी वनविभागाने पुढाकार घेऊन गावागावात जनजागृती करायला पाहिजे अशी चर्चा पारगाव येथील समस्त नागरीक करीत आहे.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here