Homeक्राइमट्रॅकखाली आल्याने दोन बहिणीसह भावाचाही जागेवरच मृत्यू...

ट्रॅकखाली आल्याने दोन बहिणीसह भावाचाही जागेवरच मृत्यू…

कंपनीत कामासाठी दोघा बहिणीला सोडण्यासाठी जाणाऱ्या दुचाकीला ट्रकने धडक दिल्याने दुचाकीस्वार तिघेही बहीण-भाऊ ट्रकच्या चाकाखाली सापडून ठार झाले. हा भीषण अपघात आज गुरुवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास वाळूज उद्योग नगरी (औंरगाबाद) येथे घडला.

या विषयी प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार दीपक कचरू लोखंडे 20, रा.ओम साईनगर, रांजणगाव) हा आज गुरुवारी सकाळी मोठी बहीण अनिता (22)व लहान बहीण निकिता (18)या दोघींना दुचाकी (क्रमांक एम एच 21,ए एम 6995) वरून त्यांना कंपनीत कामावर सोडण्यासाठी चालला होता.

रांजणगाव फाटा येथून उद्योग नगरीतील रेणुका ऑटो या कंपनीत जात असताना सकाळी 8 वाजेच्या सुमारास एनआरबी चौकलगत दीपक याच्या दुचाकीला ट्रकने (क्रमांक एम एच 04,एफ जे 5288) धडक दिली. या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडून तिघेही बहीण- भाऊ गंभीर जखमी होऊन त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच रांजणगाव चे माजी उपसरपंच अशोक शेजुळ, रामचंद्र पाटील, शिवगिर गिरी, रोहिदास मारकवड, सुरेश गायकवाड यांनी तिघांना रुग्णवाहिकेतुन शासकीय रुग्णालयात दाखल केले.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!