Homeआंतरराष्ट्रीयशहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील... "आमचं काय आज आहे...

शहीद जवानाचा शेवटचा संवाद वाचून डोळे भरून येतील… “आमचं काय आज आहे तर उद्या नाही”

जळगाव : जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये आणखी एका महाराष्ट्राच्या पुत्राला वीरमरण आलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील पिंपळगाव इथला एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर येत आहे. आज जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्यात दोन जवानांना वीरमरण आलं. त्यात एक जवान चाळीसगाव तालुक्यातील असल्याचं सांगण्यात येत आहे.

अधिक माहितीनुसार, यश दिगंबर देशमुख असं शहीद जवानाचं नाव आहे. यश हे अवघ्या 20 वर्षांचे होते. अगदी वर्षभराआधीच ते सैन्यदलात भरती झाले होते. ट्रेनिंगनंतर जम्मू काश्मीर इथं त्यांना तैनात करण्यात आलं. आज दुपारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. यश देशमुख यांना आधीपासूनच सैन्य दलाचं आकर्षण होतं. त्यासाठी त्यांनी खूप परिश्रम घेत आणि सैन्य दलात भरती झाले होते. त्यामुळे त्यांच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे.

यश देशमुख यांच्या पश्चात त्यांचे आई-वडील आणि एक भाऊ असं कुटुंब आहे. यश हे आज दुपारी 2 वाजता शहीद झाल्याची माहिती कळताच संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आपला लेक देशासाठी शहीद झाला आहे हे अद्याप त्यांच्या आई-वडिलांना सांगण्यात आलं नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार अमोल मोरे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मृत यश दिगंबर देशमुख शहीद झाल्याची महिती त्यांना मिळाली असून यश देशमुख यांचे पार्थिव मूळ गावी कधी आलं जाईल याबाबत अजून कुठलीही माहिती देण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, यश यांच्या जाण्याची बातमी कळताच संपूर्ण पंचक्रोशीत दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शहीद जवानांच्या पार्थिवाच्या दर्शनाची आता सगळ्यांना ओढ लागली आहे. यश यांच्या बातमीमुळे पीपळगाव शोकसागरात बुडालं आहे. एकही चूल गावात पेटली नसून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे.

 

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!