चंद्रपुरमध्ये ओबीसी जातनिहाय जनगणनेसाठी निघाला विशाल मोर्चा

0
400

चंद्रपूर:

चंद्रपूर ओबीसी जातनिहाय जनगणना करण्यात यावी या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी संविधानदिनी चंद्रपूरात ओबीसी समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. येथील स्थानिक आंबेडकर महाविद्यालयातील ऐतिहासिक दिक्षाभूमीवरून मोर्चाला सुरुवात झाली.

मोर्चा चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट मार्गे गांधी चौकातून वळसा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. त्यावेळी तेथे सभा घेण्यात आली. मोर्चात संयोजक बळीराज धोटे, डॉ.राकेश गावतुरे, अँड. पुरुषोत्तम सातपुते, अँड. दत्ता हजारे, सुर्यकांत खनके, विजय बदखल यांच्यासह विविध पदाधिकारी, जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या मोर्चात विविध राजकीय पक्ष, संघटनांनी या मोर्चाला पाठिंबा दिला होता. मोर्चात हजारोंच्या संख्येने महिलांसह युवक – युवतींनी सहभाग घेतला होता. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here