चंद्रपूर; जिल्ह्यात मागील २४ तासात २५२ जणांनी केली कोरोनावर मात

0
190

चंद्रपूर: जिल्ह्यात मागील २४ तासात २५२ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर १५५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १९ हजार ३५८ वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १७ हजार ७३३ झाली आहे. सध्या १ हजार ६९६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ४६ हजार ४४० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख २२ हजार ८५९ नमुने निगेटीव्ह आले आहेत. गुरुवारी मृत झालेल्या बाधितामध्ये वरोरा तालुक्यातील सोयता येथील ७२ वर्षीय पुरूष व घोट चार्मोशी जिल्हा गडचिरोली येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २८९ बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६८ , तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १२, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा. वेळोवेळी हात स्वच्छ करणे तसेच सुरक्षित अंतराचे पालन करावे. कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here