वढोलीत २०० घरावर लागल्या ओबीसी जनगणनेच्या पाट्या…

0
209

गोंडपीपरी

गोंडपीपरी तालुक्यातील वढोली गावात ओबीसी जनगणनेच्या जनजागृतीसाठी दोन दिवसांत १०० घरांवर पाट्या लावल्या गेल्या आहेत. गावातील तरुण मंडळी पुढे येऊन ओबीसी जनगणना जनजागृती आणि पाटी लावा मोहिम गावात राबविली गेल्या नव्वद वर्षापासून ओबीसी प्रवर्गाची जातनिहाय जनगणना झाली नाही.

सन १९३१ नंतर भारतात ओबीसी जनगणना झाली नसून, ओबीसी समाजाची अधिकृत आकडेवारी आजपर्यंत कळली नाही आणि त्यामुळे ओबीसी समाज हा शासन दरबारी वंचित आहे. ओबीसी समाज‌ हा भारताच्या एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० ते ६० टक्के असूनही भारतीय व्यवस्थेच्या प्रत्यक्ष कार्यप्रणाली मध्ये सहभागी करुन घेतले जात नाही.
ओबीसी प्रवर्गाची जनगणना झालीच तर शासनाच्या विविध योजना, विभागीय कार्यालय , शैक्षणिक, औद्योगिक, आर्थिक, सामाजिक, राजकीय याठिकाणी हक्क अधिकार देणे क्रमप्राप्त ठरते. म्हणून ओबीसी जनगणना होणे आवश्यक आहे. यासाठी वाढोलीतील तरुण मंडळीने पुढाकार घेऊन पाटी लावा मोहीम सुरू केली होती यात संदिप लाटकर,प्रीतम कोहपरे,पतृ बोरकुटे,संदिप तारोडे, संतोष बोरकुटे यांनी सहकार्य करून ही मोहीम यशस्वी केली..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here