प्राचार्याने केली महीला प्राध्यापिकेकडून शरीरसुखाची मागणी

979

मूर्तिजापूर: गाडगे महाराज महाविद्यालयात कार्यरत प्राचार्य यांनी पदाचा दुरुपयोग करीत महिला प्राध्यापक यांची विविध कामात अडवणूक करीत शरीर सुखाची मागणी करीत असल्याच्या तक्रारीवरून प्राचार्य विरुद्ध आज, ता. २३ नोव्हेंबर रोजी स्थानिक सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

प्राप्त माहितीनुसार महिला प्राध्यापक यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या येथील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्याच महाविद्यालयातील प्राचार्य संतोष माधव ठाकरे (वय ५६) हे हेतुपरस्पर माझ्यावर वाईट नजर ठेवून माझ्यासोबत वाईट इराद्याने जवळीक साधून संबंधाची मागणी करीत, न केल्यास तुमचे प्रमोशन, विविध मिळणारे भत्ते, पगारवाढ यात अडथडळे आणीत मानसिक त्रास देत असल्याची फिर्याद दिली.

या फिर्यादीवरून स्थानिक गाडगे महाराज महाविद्यालयातील प्राचार्य संतोष ठाकरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सिटी पोलिस ठाण्याचे महिला सहायक निरीक्षक संगीता गावडे करीत आहे.