Advertisements
Home आंतरराष्ट्रीय आयफोन घेण्यासाठी तिने विकली किडनी...पण आज झाली अशी अवस्था...

आयफोन घेण्यासाठी तिने विकली किडनी…पण आज झाली अशी अवस्था…

आयफोन हा स्टेटस सिम्बॉल मानला जातो. अँड्रॉईड फोनपेक्षा किमतीला खूप महाग असल्याने त्याच्या किमतीबाबतीही अनेक विनोद केले जातात. त्यातला एक गाजलेला विनोद म्हणजे किडनी विकून फोन घेणे. पण कुणी खरंच तसं केलं तर? विनोदात म्हटली जाणारी गोष्ट खरोखर एका महिलेने केली आहे. वांग शांगकु नावाच्या एका चिनी महिलेला नऊ वर्षांपूर्वी आयफोन आणि आयपॅड घेण्यासाठी पैसे हवे होते.

Advertisements

दोघांची किंमत जबरदस्त असल्याने तिने पैशांची जमवाजमव करायला सुरुवात केली. मात्र, पैसे कमी पडत असल्याचं दिसल्यावर तिने आपली किडनी विकायला काढली. त्यावेळी वांग अवघी सतरा वर्षांची होती. तिने हुनान प्रांतात अवैध पद्धतीने आपली उजवी किडनी काढायची शस्त्रक्रिया केली.

या किडनीला तिने 3273 अमेरिकन डॉलर्स (दोन लाख 42 हजार रुपये)ना विकलं. मिळालेल्या रकमेतून तिने एक आयफोन आणि एक आयपॅड खरेदी केलं. ही घटना तब्बल नऊ वर्षांपूर्वी म्हणजे 2011 मध्ये घडली.

ही शस्त्रक्रिया केल्यानंतर वांगच्या दुसऱ्या किडनीत संसर्ग झाला. जसजशी वर्षं पुढे जाऊ लागली, तसतशी तिची तब्येत बिघडू लागली. तिला डायलिसिसचा आधार घ्यावा लागला. आज वांग 25 वर्षांची आहे. पण तिची प्रकृती फारशी बरी नसते. एकच किडनी असल्याने तिला सतत डायलिसिसचा आधार घ्यावा लागतो. ती सध्या अंथरुणाला खिळलेली आहे. आणि तिच्या तब्येतीत सुधारणा होण्याची शक्यता नसल्याचं वैद्यकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

डिजिटल मीडिया पब्लिशर अँड न्यूज पोर्टल ग्रिवेंस कौन्सिल ऑफ इंडिया” या स्वनियमन संस्थेला माहिती व प्रसारण खात्याकडून मान्यता…स्वनियमन संस्थेशी संलग्न असलेल्या इंडिया दस्तक न्यूज...

नवीदिल्ली (प्रतिनिधी) भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल...

नवलच! ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…

जोहान्सबर्ग : पूर्वी 'अवघे पाऊणशे वयोमान' असलेल्या पुरुषांची कोवळ्या मुलींशी 'जरठकुमारी' लग्नं होत असत. मात्र, सध्या अनेक जोडपी कुणाच्या दबावामुळे नव्हे तर हौसेने अशी...

देश कोरोनामुक्त झाल्याचे कळताच पंतप्रधान लागल्या नाचायला…

जगभरात कोरोना व्हायरसचा धुमाकूळ अद्याप सुरू आहे. मात्र न्‍यूझीलंड कोरोना व्हायरस मुक्‍त देश ठरला आहे. न्‍यूझीलंड सरकारने कोरोना व्हायरसचा एकही ऍक्टिव्ह रुग्ण नसल्याने सर्व...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

मनेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट सामन्याचा आयोजन श्रीमंत राजे अम्ब्रीशराव महाराज यांच्या हस्ते क्रिकेट सामन्याचा उदघाटन

प्रितम म. गग्गुरी(उपसंपादक) आल्लापल्ली :- दिनांक २६ जानेवारी २०२३ ला मन्नेवार टायगर्स क्रिकेट क्लब यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल(सर्कल)क्रिकेट सामन्यांचे आयोजन राजे धर्मराव हायस्कूल आल्लापल्ली...

प्रणालीने शालेय साहित्य वितरण करून साजरा केला वाढदिवस…

चंद्रपुर: आपला वाढदिवस हा केक कापून साजरा व्हावा असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी अनेकजण अवाढव्य खर्च करून आपला वाढदिवस साजरा करतात. परंतु प्रणाली दहागावकर या...

आयुष्मान कार्ड असेल तर मिळेल राव,पाच लाखांपर्यंतचा मोफत ईलाज..

बळीराम काळे जिवती : ( तालुका प्रतिनिधी) केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्य राज्य सरकारने माहत्मा फुले जन आरोग्य योजनेचा अंतर्भाव करून,आयुष्मान भारत ही...

सिंदेवाही महीला शहर काँग्रेस तर्फे हळदी -कुंकू कार्यक्रमाचे आयोजन… हजारो महिलांची उपस्थिती – मकरसंक्रांत निमित वाणाचे वितरण…

सिंदेवाही- महीला शहर काँग्रेस तर्फे स्थानीक श्रवण लॉन सभागृहात मकरसंक्रांतीच्या पर्वावर हळदी- कुंकू तथा वान वितरणाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी प्रामुख्याने कार्यक्रमाच्या उद्घाटक म्हणून राज्याच्या...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!