सिदूर येथे ओबीसी जनजागृती रॅलीचे आयोजन

429

दिनांक 20 नोव्हेंबर ला सिदूर येथे ओबीसी समन्वय समिती तर्फे ओबीसी जनजागृती तसेच 26/11 संविधान दिनी चंद्रपूर येथे होणाऱ्या ओबीसी मोर्चा च्या अनुषंगाने जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले, रॅली मध्ये नारे तसेच गाण्याच्या माध्यमातून ओबीसी जनजागृती करण्यात आली. गावातील प्रत्येक चौकात थांबून लोकांना ओबीसी जनगणना चे महत्व पटवून सांगितले.
यावेळी गावातील युवक अतुल येरगुडे यांनी सांगितले की, “गेली नव्वद वर्षे झालीत पण ओबीसी (VJ, DNT, NT, SBC) प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झाली नाही. सन 1931 ला भारतात ओबीसींची जातीनिहाय जनगणना झाली होती. तेव्हापासून आजपावेतो ओबीसींची स्वतंत्र जातीनिहाय जनगणना झाली नाही. आजपर्यंत ओबीसी समाजाची आकडेवारी कळली नाही. त्यामुळे ओबीसी समाज अनेक सुविधेपासून वंचित आहे. ओबीसी प्रवर्गाची जातीनिहाय जनगणना झालीच तर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय ठिकाणी हक्क व अधिकार मिळेल.”
यासाठी संपूर्ण जिल्हाभर तसेच गावागावात ओबीसी जनजागृती रॅलीचे आयोजन सुरू आहेत. संपूर्ण ग्रामवासीयांनी 26/11 संविधान दिन ला होणाऱ्या ओबीसी विशाल मोर्चात सहभागी होण्याचे ठरविले.
यावेळी गावातील युवक अतुल येरगुडे, प्रवीण अटकारे, धर्मपाल कांबळे, राहुल कांबळे, सतीश उलमाले, सूरज माथूलकर, संकेत निखाडे, स्वप्नील मा. येरगुडे, स्वप्नील आगरे, गणेश निखाडे, योगेश मत्ते, मनोज मत्ते, स्वप्नील म. येरगुडे, स्वप्नील थेरे, सिद्धांत कांबळे, हर्सल थेरे, मेघराज उलमाले, अजय येरगुडे, अनिकेत थेरे, पवन येरगुडे व इतर युवकांनी विशेष परिश्रम घेतले.