आज दुपारी घुग्घुस येथील अमराई वार्ड परिसरातील प्रचल वानखेडे, प्रविन गेडाम, क्रुती आसुटकर, अनिल गोगला व सुजल हे पाच युवक वर्धानदीत पोहण्यासाठी गेले. सुरज वानखेडे, प्रचल वानखेडे, आसुटकर, अनिल गोगला आज दुपारी वर्धा नदीवर आंघोळीसाठी गेले असता. एक युवक पाण्यात बुडाला हे बघुन त्यांच्या तिन मित्रांनी वाचवण्यासाठी प्रयत्न केला असता प्रचल वानखेडे, प्रविण गेडाम व क्रुती आसुटकर हे तिघे खोल पाण्याचा प्रवाहात वाहुन गेले.
आरडाओरडा केल्याने लोकांनी घटनास्थळी बचावासाठी गर्दी केली होती.
हि माहिती मिळताच नकोडा गावाचे माजी उपसरपंच मोहम्मंद हनिफ यांनी घटनास्थळी धाव घेतली. घुग्घुस पोलिसांन कडुन शोध मोहीम राबविण्यात येत आहे. अनिल गोगला व सुजल हे दोन युवक बचावले.






