नवलच! ८० वर्षाचा नवरदेव आणि २९ वर्षाची वधु…

0
760

जोहान्सबर्ग : पूर्वी ‘अवघे पाऊणशे वयोमान’ असलेल्या पुरुषांची कोवळ्या मुलींशी ‘जरठकुमारी’ लग्नं होत असत. मात्र, सध्या अनेक जोडपी कुणाच्या दबावामुळे नव्हे तर हौसेने अशी लग्नं करीत असतात. आता दक्षिण आफ्रिकेत 80 वर्षे वयाच्या एका वृद्ध माणसाने 29 वर्षांच्या तरुणीशी लग्न केले आहे. हा 80 वर्षांचा वृद्ध म्हणजे माझे ‘खरे प्रेम’ असल्याचे वधूने म्हटले आहे!

केपटाऊनमध्ये हा अनोखा विवाह सोहळा पार पडला. या वधू-वरांच्या वयात तब्बल 51 वर्षांचे अंतर आहे. वधू तेरजेल रासमुस हिने सांगितले की तिचे पती विल्सन रासमुस हे काळजी घेणारे पती आहेत. विल्सन यांचा मुलगा तेरजेल हिच्यापेक्षा तीस वर्षांनी मोठा आहे.

त्यामुळे आपण त्याच्या सावत्र आईची भूमिका बजावत नाही असेही तिने सांगितले. या अनोख्या प्रेमकहाणीची सुरुवात 2016 मध्ये झाली. त्यावेळी एका स्थानिक कार्यक्रमात हे दोघे आले होते आणि ‘पहिली नजर में प्यार हो गया’ अशी दोघांची अवस्था झाली. नातवंडे-परतवंडे असूनही विल्सन यांचे प्रेम खट्याळ आणि शानदार असल्याचे तेरजेलचे म्हणणे आहे. एकमेकांवर प्रेम जडल्यावर दोघांनी डेटिंग सुरू केले. या प्रेमामुळे विल्सन यांना वृद्धावस्थेत देखभाल करण्यासाठी तरुण पत्नी मिळाली आणि तेरजेलला एक बुद्धिमान, अनुभवी व प्रेमळ पती मिळाला. विशेष म्हणजे दोघांच्या लग्नात विल्सनची 56 वर्षांची कन्याही सहभागी झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here