चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासात १७५ कोरोनाबाधित तर ३६९ कोरोनामुक्त…

0
253

चंद्रपूर २१ नोव्हेंबर-

जिल्ह्यात मागील २४ तासात ३६९ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, पण दुसरीकडे १७५ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या १८ हजार ५०४ वर पोहोचली आहे.

सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या १६ हजार ३४८ झाली आहे. सध्या १ हजार ९७६ बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३८ हजार ५२१ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख १५ हजार ३८९ नमुने निगेटीव्ह आले आहेत. शनिवारी मृत झालेल्या बाधितांमध्ये ब्रह्मपुरी येथील ६५ वर्षीय पुरुष व घुग्गुस येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत २८० बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील २६०, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली ११, यवतमाळ पाच, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. नागरिकांनी बाहेर निघतांना काळजी घ्यावी, मास्क लावणे, हात धुणे तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करून कोरोना पासून सुरक्षित राहण्यासाठी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here