डोंगरगावात विजेचा लपंडाव….जनतेची कर्मचाऱ्यांकडे धाव

449

धाबा:- गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथे सबस्टेशन असून सुद्धा वीज वारंवार जात असल्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे…

वीज कधी येईल कधी जाईल याचा काही नेम नाही. रात्री झोपेत असतांना वीज जाते अन सकाळी उठल्यावर वीज येते अशी काही परिस्थिती सध्या डोंगरगावात सुरू आहे. विजेच्या अश्या लपंडावामुळे परिसरातील जनता त्रस्त झाली असून ही समस्या घेऊन जेव्हा लोक सबस्टेशन ला जातात तेव्हा येथील इंजीनियर आणि कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत असतात…

गेल्या सहा महिन्यांपासून डोंगरगाव सबस्टेशन ला लाइनमॅन नसून अनेकदा सामान्य जनतेला विजेच्या लपंडावामुळे खूप त्रास होत आहे. आता सर्वसामान्य लोकांची समस्या कुणी ऐकायला तयार नाही तेव्हा आपली समस्या घेऊन कुणाकडे जावे हाच प्रश्न आता डोंगरगाव वासीयांना पडला आहे….