Homeचंद्रपूररंजन लांडे यांची राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदी निवड

रंजन लांडे यांची राजुरा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष पदी निवड

 

राजुरा (ता.प्र) :– राजुरा विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांचे खंदे समर्थक, ग्रामीण आणि शेतकरी जनमानसात जम असलेला युवादिलाचा तरूण लढवय्या काँग्रेस कार्यकर्ता रंजनभाऊ लांडे यांची राजुरा तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. आमदार सुभाष धोटे यांनी आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष तथा महाराष्ट्राचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे पत्र देऊन रंजन लांडे यांच्या नावाची अधिकृतरीत्या घोषणा केली.
रंजन लांडे हे एका शेतकरी कुटुंबातील सर्व सामान्य काँग्रेस कार्यकर्ते असून अनेक वर्षांपासून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. २००५ मध्ये राजुरा तालुका युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, २००७ ते २०११ पांढरपाैणी ग्रामपंचायतचे सदस्य, २००८ ते २०१४ कृषी उत्पन्न बाजार समिती राजुराचे संचालक, २०१५ ते २०२० तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केले आहे.
आमचे नेते आणि मार्गदर्शक राजुरा विधानसभा क्षेत्राचे विकासपुरुष आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे माझ्या नावाची शिफारस करून मला नवीन जबाबदारी दिली आहे याबद्दल मी शतशः ऋणी आहे. सुभाषभाऊंच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये तालुकाध्यक्षपदी काम करून ग्रामीण, शहरी सर्व स्तरातील काँग्रेस कार्यकर्त्यांना सोबत घेऊन तालुका काँग्रेसला अधिक बळकट करण्यासाठी आपण नव्या जोमाने कामाला लागणार अशी प्रतिक्रिया रंजन लांडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
त्यांच्या या निवडीबद्दल आमदार सुभाषभाऊ धोटे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी तालुकाध्यक्ष दादा पाटील लांडे, अशोकराव देशपांडे, हमीदभाई, नगराध्यक्ष अरुण धोटे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, प स सभापती सौ मुमताज अब्दुल जावेद, उपसभापती मंगेश गुरणुले, पं स सदस्य सौ. कुंदा अविनाश जेनेकर, तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, जि प सदस्य सौ. मेघाताई नलगे, डॉ नामदेव करमरकर, कार्याध्यक्ष नंदु वाढई, शंकर गोनेलवार, महिला काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा कविता उपरे, राजुरा विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष एजाज अहमद, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष शेन्डे, शहराध्यक्ष अशोक राव, अमोल घटे, इर्शाद शेख, कवडु सातपुते, विकास देवाळकर, धनराज चिंचोलकर, विनोद झाडे, राजकुमार ठाकूर, संतोष इंदुरवार, हेमंत झाडे, प्रा. प्रफुल्ल शेंडे, शाहनवाज कुरेशी यासह तालुका काँग्रेस, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल काँग्रेस, किसान सेल, अल्पसंख्यक विभाग, अनु जाती अनु जमाती विभाग, एनएसयूआय अशा काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!