जिवती तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत (RCPLWEA)१४ रस्ते आणि ३२ पुल बांधकामाचे उद्घाटन

426

 

खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या उपस्थितीत भुमीपुजन.

राजुरा (ता.प्र) :– जिवती तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रस्ते व फुलांच्या कामांचे उद्घाटन मा. खासदार सुरेश उर्फ बळूभाऊ धानोरकर आणि आमदार सुभाषभाऊ धोटे यांचे हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिवती तालुक्यातील शेडवाही गावातील नागरीकांकडून आदिवासी समाजाच्या परंपरेनुसार मा. खासदार बळूभाऊ धानोरकर आणि मा. आमदार सुभाष धोटे यांचे घुसाडीच्या व ढोल वाद्यांच्या गजरात जंगी स्वागत केले. या दौऱ्यात खडकी रायपुर, गुडसेला, कोदेपूर, या गावांनाही मान्यवरांनी धावती भेट दिल्या.
राजुरा विधानसभा क्षेत्रातील आदिवासी बहुल अतिदुर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत डावी कडवी विचारसरणीग्रस्त भागातील रस्त्यांच्या (RCPLWEA) कामांपैकी चंद्रपूर जिल्ह्यातील एकुण १३१.९६ किमी. लांबीचे २० रस्ते व ४४ पुलांचे कामे अशी ६४ कामास मंजुरी प्राप्त आहे. या कामांसाठी केंद्र शासनाचा ६० टक्के व राज्य शासनाचा ४० टक्के अर्थ सहाय्य असणार आहे. यामध्ये जिवती तालुक्यातील शेनगांव, पुडीयालमोहदा ते वणी खुर्द, दमपूरमोहदा ते पुडीयालमोहदा वरील पुलाचे काम, वणी (बु), गुडशेला, येल्लापूर ते सावलहीरा कोरपना मार्ग, येल्लापूर ते रोडगुडा मार्ग, घारपना पोच रस्ता, महाराजगुडा मुकादमगुडा ते परमडोली रस्ता, टेकामांडवा, माराईपाटण ते भारी ते राज्य सीमे पर्यंत, चीतीगुडा ते मच्छिगुडा कमलापूर रस्ता, वादिगुडा पोचरस्ता, काकबन-खडकी-रायपूर रस्ता व पुल, पाटण ताताकोहाड पोचरस्ता, पल्लेझारी माथाडी ते पित्तीगुडा रस्ता, कुंभेझरी ते नारायणगुडा रस्ता, चिखली ते लेंडीगुडा रस्ता, हे १४ रस्ते व त्यावरील ३२ पुलांची कामे आहेत. तसेच सर्व रस्ते गुणवत्ता पूर्ण व ५ वर्षाच्या देखभाल दुरुस्तीच्या हमीवर करण्यात येणार आहे.
या प्रसंगी मा. अरुनभाऊ धाेटे नगराध्यक्ष राजुरा, पं. स. सभापती अंजनाताई पवार, पं. स. सदस्या अनिताताई गोतावडे, गणपत आडे अध्यक्ष तालुका कॉंग्रेस कमिटी जिवती, नंदाताई मुसने तालुका कॉंग्रेस महिला अध्यक्ष, माजी सभापती सुग्रीव गोतावडे, सिताराम मडावी अध्यक्ष तालुका युवक कॉंग्रेस जिवती, अशपाक शेख उपनगराध्यक्ष नगर पंचायत जिवती, विजय राठोड, सुभाष राठोड, दत्ता तोडासे, किसन राठोड, किसन पाटील नैताम, मारोती कुमरे, यासह मोठ्या संख्येने कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थितीत होते.

प्रसिद्धी प्रमुख
राजुरा विधानसभा काँग्रेस.