Homeचंद्रपूरविधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती

विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती

Advertisements

चन्द्रपुर / पकज रामटेके

Advertisements

महाराष्‍ट्र विधीमंडळाच्‍या लोकलेखा समितीच्‍या अध्‍यक्षपदी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे.

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या अध्‍यक्षतेखाली गठीत या लोकलेखा समितीच्‍या सदस्‍यपदी माजी मुख्‍यमंत्री आ. पृथ्‍वीराज चव्‍हाण, विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते तथा माजी कृषीमंत्री आ. राधाकृष्‍ण विखे पाटील, माजी शालेय शिक्षण मंत्री अॅड. आ. आशिष शेलार, माजी पर्यटन मंत्री आ. जयकुमार रावल, माजी मंत्री आ. विनय कोरे, माजी राज्‍यमंत्री आ. संजय सावकारे आदींचा समावेश आहे.

लोकलेखा समिती ही महाराष्‍ट्र विधानसभा आणि विधान परिषदेची संयुक्‍त समिती असून विधीमंडळाच्‍या कामाकाजात या समितीचे विशेष महत्‍व आहे. राज्‍याचे विनियोजन लेखे व नियंत्रक तसेच महालेखापरिक्षक यांचा अहवाल, यांचे परिनिरीक्षण करणे, राज्‍य शासनाच्‍या वित्‍तीय लेख्‍यांचे व त्‍यावरील लेखा परिक्षा अहवालाचे परिनिरीक्षण करणे, राज्‍याची महामंडळे, व्‍यापार विषयक व उत्‍पादन विषयक योजना व प्रकल्‍प यांचे उत्‍पन्‍न व खर्च दाखविणारी लेखा विवरणे तसेच एखादे विशिष्‍ट महामंडळ, व्‍यापारी संस्‍था किंवा प्रकल्‍प यांना भांडवल पुरविण्‍यासंदर्भात नियमन करणा-या वैधानिक नियमांच्‍या तरतूदी अन्‍वये तयार केलेला ताळेबंद व नफा तोटयाच्‍या लेख्‍यांची विवरणे व त्‍यावरील नियंत्रक व महालेखापरिक्षक यांचा अहवाल तपासणे, राज्‍यपालांनी कोणत्‍याही जमा रकमांची लेखा परिक्षा करण्‍याबाबत किंवा साठा व मालासंबंधीचे लेखे तपासण्‍याबाबत नियंत्रक व महालेखापरिक्षक यांना निर्देशीत असेल त्‍याबाबतीत त्‍यांच्‍या अहवालाचा परिक्षण करणे ही लोकलेखा समितीची प्रमुख कर्तव्‍ये आहेत.

अर्थमंत्री म्‍हणून अनेक धोरणात्‍मक निर्णय घेत राज्‍याच्‍या आर्थिक प्रगतीत महत्‍वपूर्ण योगदान देणा-या आ. सुधीर मुनगंटीवार यांच्‍या या समितीच्‍या अध्‍यक्ष पदावरील नियुक्‍तीला विशेष महत्‍व प्राप्‍त झाले आहे. आ. सुधीर मुनगंटीवार यांची लोकलेखा समिती अध्‍यक्षपदी निवड झाल्‍याबद्दल माजी केंद्रीय गृहराज्‍यमंत्री हंसराज अहीर, भाजपाचे ज्‍येष्‍ठ नेते चंदनसिंह चंदेल, आ. किर्तीकुमार भांगडीया, आ. प्रा. अनिल सोले, आ. रामदासजी आंबटकर, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्‍हाध्‍यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, भाजपाचे माजी जिल्‍हाध्‍यक्ष तथा बल्‍लारपूरचे नगराध्‍यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, अॅड. संजय धोटे, सुदर्शन निमकर, जिल्‍हा सरचिटणीस राजेंद्र गांधी, संजय गजपूरे, कृष्‍णा सहारे, राजेश मुन, नामदेव डाहूले, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, महापौर सौ. राखी कंचर्लावार, उपमहापौर राहूल पावडे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, भाजयुमो महानगर जिल्‍हाध्‍यक्ष विशाल निंबाळकर, अल्‍का आत्राम, सौ. अंजली घोटेकर, वसंत देशमुख, प्रकाश धारणे आदींनी त्‍यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!