” तिने ” तीन महीण्यात तिघांशी केले लग्न

0
880

मुंबई. लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अशातच काही जणांनी आर्थिक दरी भरून काढण्यासाठी वाम मार्गाचा पर्याय स्वीकारला.
महाराष्ट्रातल्या एका २६ वर्षीय तरुणीने पैशांसाठी चक्क तीन महिन्यात तीन जणांशी लग्न केले. लग्नानंतर सासरचे दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तूंसह पोबारा केला. विजया  असे या तरुणीचे नाव आहे, ती मुकुंदवाडी परिसरात राहते. विशेष म्हणजे विजया विवाहित आहे.

कोरोना काळात तिचा आणि त्याच्या नवऱ्याचा दोघांचाही रोजगार गेला. त्यामुळे त्यांनी लोकांना फसविण्याचा धंदा सुरु केला. दोघे मिळून आधी विवाह इच्छुक मुलांची माहिती काढायचे आणि लग्नाचा घाट घालायचे, नंतर लग्नात आलेले सर्व दागिने, पैसे आणि मौल्यवान वस्तू घेऊन तेथून पोबारा करायचे. फसवणूक झालेल्या तरुणाने पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे केली तेव्हा हा प्रकार समोर आला. पोलिसांनी विजया  आणि तिच्या पतीला ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here