कवठेंचा पक्ष प्रवेशा दरम्यान ” फ्रेम ” मध्ये आलीत लुप्त झालेली चेहरे

0
379
Advertisements

 

शेतकरी संघटनेला रामराम करीत राजेश कवठे यांनी परत एकदा हाताला घडी बांधली.कवठेंचा पक्ष प्रवेशाची तालुक्यात फार चर्चा झाली ,असे नाही मात्र पक्ष प्रवेशाचा वेळी लुप्त झालेले काही चेहरे ” फ्रेम ” मध्ये दिसलीत. या चेहर्यांची चर्चा मात्र तालुक्यात चांगलीच रंगली. पाच वर्ष ज्यांचा हाताला कधीच घडी दिसली नाही,ते आम्ही घडीवालेच म्हणून पुढेपुढे होतांना दिसले.

राजकारणात इकडुन तिकडे,तिकडून इकडे उड्या मारणे नवे नाही.दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत ” ये जा ” करणाऱ्या नेत्यांचा बातम्या आपण ऐकत असतो.गोंडपिपरी तालुक्यातील राजकारणात ज्यांनी ठसा उमटविला अश्यात राजेश कवठे यांच्या समावेश होतो. त्यांचा तीन पक्षात घरोबा झाला आहे. मात्र एकाही घरात फार काळ संसार टिकला नाही. आता परत त्यांनी हाताला घडी बांधली.सामान्यांचा प्रश्नासाठी धावून जाणारे कवठे यांच्या पक्ष प्रवेश्याची चर्चा तालुक्यात रंगायला हवी होती. मात्र कवठेंचा पक्ष प्रवेशाची फार चर्चा रंगली नाही. मात्र पक्ष प्रवेशाचा दरम्यान काही चेहरे फोटो फ्रेम मध्ये आलीत.हे चेहरे तालुक्यासाठी नवे नाहीत.ओळखीचेच आहेत.मात्र  मागिल पाच वर्षातील पक्षासाठी यांची कामगिरी शुन्यात गणली जाईल,अशीच आहे. जेव्हा पक्षाला खरी गरज होती नेमकी त्यावेळीच हातातील घडी काढून यांनी खिश्यात ठेवली. काही संघटनांशी हे जूळले. तालुक्यात घडीची टिकटिक मंदावली होती.मात्र अश्या वेळीही यांनी घडीकडे दुर्लक्ष केले. पडत्या काळात ज्या सूरजने घडीला तालुक्यात सन्मानाची जागा मिळवून दिली. त्या ” सूरज ” ला ग्रहण लागले.( त्याचा गेम करण्यात आला अशी चर्चा ही मध्यंतरी सूरू होती ) सूरज असे पर्यंत ” हे ” चेहरे लुप्त झाली होती. अचानक कवठेंचा प्रवेशावेळी हरविलेले चेहरे पुन्हा फ्रेम मध्ये आल्याने अनेकांचा भुवय्या उंचावल्या. ” आम्ही घडीवालेच..! असा नारा त्यांनी दिला.”

Advertisements

राजकारणात  चापलूसी करणारे अन संधीसाधूंचा तसाही बोलबाला असतो. तालुक्यात कवठेंचा काही प्रमाणात प्रभाव आहे.भविष्यात घडीचा टिकटिक आवाज वाढणार,असा अंदाज बांधून कोपऱ्यात बसलेले चेहरे फ्रेम मध्ये आली असावीत,अशी चर्चा तालुक्यात आहे.

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here