HomeBreaking Newsएकनाथ खडसेंची भाजपवर पहीली " सर्जिकल स्ट्राईक " ;60 जण राष्ट्रवादीत दाखल

एकनाथ खडसेंची भाजपवर पहीली ” सर्जिकल स्ट्राईक ” ;60 जण राष्ट्रवादीत दाखल

जळगाव

माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर जळगावमध्ये भाजपला पहिला हादरा दिला आहे. जिल्ह्यातील 60 भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळे भाजपला आधीच मोठा धक्का बसला आहे. खडसे यांच्या राष्ट्रवादीत प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात भाजपला खिंडार पडणार, अशी शक्यता वर्तवली जात होती. आता अखेर भाजपच्या गडाला हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.

खडसेंनी राष्ट्रवादी प्रवेश करून काही दिवस होत नाही तेच जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते गळाला लागले आहे.

जिल्ह्यातील अनेक भाजप कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. रावेर तालुक्यातील 60 भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी रोहिणी खडसे – खेवलकर यांच्या मुक्ताईनगर येथील निवासस्थानी एकनाथ खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये पदाधिकारी व कार्यकर्त्यांची इन्कमिंग सुरू झाली आहे.

अहमदनरमध्येही भाजपला धक्का

विशेष म्हणजे, अहमदनगरमध्येही भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप अध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांच्या मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी बंड पुकारला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भाजपच्या 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांसह सदस्यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. एवढंच नाहीतर श्रीरामपूर तालुक्यातील सदस्यांनी राजीनामा देऊन संचालन समिती स्थापन करत वेगळी चूल मांडली आहे.

राज्यातील पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी वर्षानुवर्षे काम करणार्या काम करणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप करत श्रीरामपूर तालुक्यातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर मनमानी कारभार करत असून पक्षाची ध्येयधोरणे न राबवता मनमानी कारभार करत असल्याचा निषेध करण्यात आला आहे. श्रीरामपूर तालुक्यासह परीसरातील 310 बुथप्रमुखांपैकी 257 बुथप्रमुखांनी आपल्यापदाचा रविवारी राजीनामे दिले आहे.

दरम्यान, ‘संपूर्ण महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांचे राजीनामे देण्यास सुरुवात झाली आहे. हे कार्यकर्ते नाराज असल्यानेच ते राजीनामे देत आहेत. नाराजीचा हा परिणाम आहे’, असं एकनाथ खडसे यांनी सांगितले.

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!