राजूरा
आज सोमवार दि. २नाेव्हेंबरला गडचांदूर येथील सर्वपक्षीय तरुण युवकांचा व इतर काही कार्यकर्त्यांनी युवा स्वाभिमान पार्टीमध्ये प्रवेश केला असल्याचे व्रूत्त आहे
युवा स्वाभिमान पार्टीत नुकतेच प्रवेश केलेले सुरज ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये आज गडचांदूर या औद्योगिक परिसरातील काँग्रेस पक्षाचे शहर अल्पसंख्याक अध्यक्ष वाजिद शेख यांनी काही तरुण कार्यकर्त्यांसह युवा स्वाभिमान प्रवेश केला असल्याचे खुद्द सूरज ठाकरे यांनी या प्रतिनिधी साेबत बाेलतांना सांगितले
या ही शिवाय इत्तर काही पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील शेकडाेंच्या संख्येने युवा स्वाभिमान पार्टी चे रवि राणा तथा नवनीत राणा यांचे वर विश्वास ठेऊन व त्यांच्या कार्याला प्रेरित होऊन युवा स्वाभिमान पार्टी मध्ये प्रवेश केला .
सुरज ठाकरे यांना नुकतेच आमदार रवी राणा यांनी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष पद देऊन पक्ष वाढीची व मजबूत करण्याची जबाबदारी दिली हाेती.त्यांचे धडाडीचे कार्य बघुन अनेक कार्यकर्त्ये या स्वाभिमान पक्षाकडे येत असल्याने आता चंद्रपूर मध्ये गाव तिथे शाखा हे अभियान ते राबविण्यांत येत आहे. या उपक्रमा अंतर्गत बरेचशे कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश घेणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले .
प्रस्थापितांना जबर हादरा सुरज ठाकरे राजूरा विधान सभा क्षेत्रात लोकप्रिय झाले हे सूर्य प्रकाश इतके सत्य आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही .