Home चंद्रपूर गोंडपिंपरी निबंधस्पर्धेत गोंडपिपरी तालुक्याचा सुरज दहागावकर याचे सूयश

निबंधस्पर्धेत गोंडपिपरी तालुक्याचा सुरज दहागावकर याचे सूयश

637

 

चंद्रपूर

रिपब्लिकन स्टुडेंट फेडरेशन इंडिया (चंद्रपूर) तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त घेण्यात आलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि शिल्पकार या स्मरणिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच बॅरि.राजाभाऊ खोब्रागडे भवन परिसरात पार पडला….
गेल्या सात-आठ महिन्यापासून जगात सर्वत्र कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे अनेक महापुरुषांच्या जयंती,उत्सव कार्यक्रम अनेक सामाजिक संघटनेने ऑनलाइन स्वरूपात घेऊन महापुरुषांना अभिवादन करीत आहेत.
अश्यातच रिपब्लिकन स्टुडेंट फेडरेशन इंडिया (चंद्रपूर) तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२९ व्या जयंतीनिमित्त विविध ऑनलाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांत निबंध स्पर्धेमध्ये सुरज दहागावकर यांने दुसरा क्रमांक प्राप्त केला. विजयादशमी च्या दिवशी छोटेखानी कार्यक्रमात सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण पार पडले.
सुरज हा मूळचा गोंडपिपरी तालुक्यातील सकमुर(चेकबापूर) या गावाचा आहे आणि सध्या चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयामध्ये अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे. सोबतच सुरज हा एक नवोदित कवी आणि लेखक असून त्याच्या लिखाणाची महाराष्ट्रातील अनेक वृत्तपत्रांनी दखल घेतली आहे हे विशेष.
विजयादशमी चे औचित्य साधून सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थित करण्यात आले……

Don`t copy text!