सोमणपल्ली गावात पाणी टंचाई ; दहा दिवसापासून नळ योजना ठप्प

772

धाबा

गोंडपिपरी तालुक्यातील सोमणपल्ली गावात मागिल दहा दिवसापासून भिषण पाणी टंचाई सूरू आहे. गावातील नळ योजना ठप्प पडल्याने पाणी भरण्यासाठी विहीरीवर महीलांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. सोमणपल्ली गावाला धाबा पाणी पूरवठा योजनेतून पाण्याचा पूरवठा केला जातो. धाबा योजनेत सूरू असलेल्या भोंगळ कारभाराचा गावकर्यांना फटका सोसावा लागत आहे.