१८ जागेसाठी ३७ जनांचे नामांकन… कृषि उत्पन्न बाजार समिति निवडणूक

231

सावली :- सावली कृषी उत्पन्न बाजार समितीची पंचवार्षिक निवडणूकचा कार्यक्रम जाहीर झालेला असून नामनिर्देशन पत्र भरण्याचा शुक्रवार दिनांक ७ मार्चला शेवटचा दिवस होता त्या शेवटच्या दिवशी एकूण ७० जणांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केलेला आहे. सन २०२५ ते २०३० या पाच वर्षाच्या कालावधीसाठी सावली कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक पार पडत आहे. त्या करिता एकूण १८ संचालकांची निवड करायची असून यात एकूण ७० जणांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

यामधे सेवा सहकारी गटातून ११ जागेसाठी ४८ जणांनी नामांकन दाखल केले तर ग्रामपंचायत गटातून ४ जागेसाठी १३ जणांनी , व्यापारी गटातून २ जागेसाठी ६ जणांनी तर मापारी १ जागेसाठी ३ जणांनी नामांकन अर्ज सादर केले. दिनांक १० रोज सकाळी ११ वाजे नंतर सर्व नामनिर्देशन पत्रांची छाननी केल्यानंतर दिनांक २५ मार्च ला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख देण्यात आलेली आहे.

दिनांक २५ नंतरच सेवा सहकारी गटातून २३ मागे,ग्रामपंचायत गटातून ०७ मागे,व्यापारी गटातून २ मागे तर मापारी गटातून १ एकूण ३३ जणांनी आपला अर्ज मागे घेतला आहे. सदर निवडणुकीत सेवा सहकारी गटाचे ४२४ मतदार,ग्रामपंचायत गटाचे ४४७,व्यापारी गटाचे १५५ तर मापारी गटाचे ३६ एकूण १०६२ मतदार निवडणूकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत,मागील पंचवार्षिक निवडणुकीत बाजार समितीवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती, मात्र बदलत्या राजकीय समीकारणामुळे आगामी निवडणुकीत बाजार समितीत कोणत्या पक्षाचा झेंडा फडकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.