संत नगाजी महाराज देवस्थानात श्री संत सेना महाराज जन्मोत्सव सोहळा साजरा

131

चंद्रपूर:- गोपाळकृष्ण व संत नगाजी महाराज देवस्थान समाधी वार्ड चंद्रपूर येथे राष्ट्रीय संत सेना महाराज जन्मोत्सव सोहळा नाभिक समाजाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी ११.०० वाजता अभिषेक, दुपारी १२.३० वाजता बाबुपेठ येथील मंजुळामाता महिला भजन मंडळातर्फे सुश्राव्य भजनाचा भक्तीमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

दुपारी ४.०० वाजता दहीहंडी व काला संत सेनाजी महाराज यांना अर्पण करण्यात येउन लगेचच महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मधुकर क्षीरसागर, राजेश बनसोड, संदिप नक्षिणे, ज्ञानेश्वर मांडवकर,सुमनताई बनसोड,आशाताई मांडवकर, संध्याताई कडूकर यांनी अथक परिश्रम केले*
या कार्यक्रमास नाभिक समाजातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.