चंद्रपूर प्रतिनिधी/ कैलास दुर्योधन
महाराष्ट्र शासनाच्या तालुका निहाय समित्या स्थापन करण्यात आल्या असून नुकतीच संजय गांधी निराधार योजना समिती ची यादी जाहीर झाली आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राजुरा चे तालुकाध्यक्ष श्री. संतोष देरकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राजुरा तालुका अध्यक्ष श्री. आसिफ सय्यद यांची समितीच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे शहरी व ग्रामीण भागातील जनतेने त्यांचे अभिनंदन केले आहे.
संतोष देरकर व आसिफ सय्यद संजय गांधी निराधार योजने पासून वंचित नागरिकांच्या समस्या निकाली काढतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. संतोष देरकर व आसिफ सय्यद यांची संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्यपदी निवड केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय खासदार श्री. शरदचंद्रजी पवार, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष श्री .राजेंद्र वैद्य ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्री .नितीन निमजे यांचे आभार व्यक्त केले आहे.
संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत विधवा, अपंग व वृद्धांना योजनेतील प्रकरणे दाखल करणार्या नागरिकांनी काही समस्या असल्यास त्यांनी संतोष देरकर व आसिफ सय्यद यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष श्री. स्वप्निल बाजूजवार यांनी केले आहे.